अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी):शिवणी-तालसवाडा रस्त्यावर एका शेताच्या कडेला ३५ वर्षीय ऑटोचालकाचा मृतदेह आढळून आल्याची घटना ८ जानेवारी रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी मृतकाच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती. त्यानंतर सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांची पोलीस कोठडी संपल्याने न्यायालयात हजर केले असता दोन्ही आरोपींना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून दोघांचीही बुलढाणा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
शिवणी-तालसवाडा रस्त्याय्वारएका शेताच्या कडेला ८ जानेवारी रोजी सकाळी अमोल भावुराव भवरे (वय ३५ वर्ष) रा.धरणगाव ता.मलकापूर या ऑटोचालकाचा मृतदेह आढळून आला होता. यानंतर मृतकाची पत्नी शितल अमोल भवरे रा.धरणगांव ता.मलकापूर यांनी माझे पती अमोल भवरे यांचा खून करून पुरावा नष्ट करण्यात आल्याबाबत तक्रार दसरखेड एमआयडीसी पो.स्टे.ला दिली होती. त्यावरून पोलिसांनी आरोपी दिनेश गणेश तायडे विरुध्द खून करून पुरावा नष्ट केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलीसांनी तपासा दरम्यान मिळालेल्या माहितीवरून नामदेव रमेश तायडे (वय ३७ वर्षे) रा.शिवनी याला ११ जानेवारी रोजी ताब्यात घेतले होते. या दोन्ही आरोपींना न्यायालयाने १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, १५ जानेवारी रोजी त्यांची पोलीस कोठडी संपल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून त्यांची रवानगी बुलढाणा कारागृहात करण्यात आली आहे.