छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): पंढरपूर येथील ३० वर्षीय शकील आरेफ शेख याची कुख्यात गुंड सय्यद सिराज अली ऊर्फ बडा सिराजने त्याच्या चार साथीदारांच्या मदतीने गळा चिरून मोठ्या क्रूरतेने हत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली. जटवाडा परिसरातील डोंगरावर शकिलचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्यास्थितीत आढळून आल्यानंतर जिल्हाभरात चांगलीच खळबळ उडाली.
मृतक शकील हा गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होता. पार्टी देण्याच्या बहाण्याने आरोपी बडा सिराज हा याने शकीलला त्याच्या कारमधून जटवाडा परिसरात घेऊन गेला. सदर ठिकाणी पैशांच्या आणि मोबाइलच्या वादातून आरोपींनी शकीलचा छळ केला. शकीलच्या हाता-पायांवर सिगारेटचे चटके दिले. त्याचा चेहरा पूर्णपणे ठेचल्यानंतर धारदार चाकूने त्याच्या हाता-पायांच्या नसांसह गळा कापला. हत्याकांडाला अंजाम दिल्यानंतर पुरवा नष्ट करण्यासाठी आरोपींनी शकीलचा मृतदेह जटवाडा परिसरातील डोंगरावर नेऊन फेकला. दरम्यान, ६ जानेवारी रोजी सकाळी मिटमिटा परिसरातील ऊर्जाभूमी भागात मॉर्निंग वॉकला गेलेल्या कही नागरिकांना डोंगरावर एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांनी सुरक्षारक्षकासोबतच संपर्क साधून याबाबत माहिती दिली, घटनेची माहिती मिळताच दौलताबाद आणि छावणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ज्ञांच्या मदतीने तपासकार्य सुरु केले. काहीवेळात सदर मृतदेह शकील शेखचा असल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी शकीलचा भाऊ सलमानने छावणी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मुख्य आरोपी बडा सिराज याला बेड्या ठोकल्या आहे. विशेष म्हणजे आरोपी २०१९ मधील एका खुनाच्या गुन्ह्यातही आरोपी असून सद्या तो जामिनावर बाहेर होता. या गुन्ह्यातील अन्य आरोपी छोटा सिराज, जब्बार, कबीर आणि अन्य एकाचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, रेखा लोंढे आणि डॉ.विवेक जाधव यांच्या मार्गदर्शनात छावणी पोलीस करीत आहेत. वाळूज एमआयडीसीतील तिसगाव शिवारातील खुनाचा गुन्हा ताजा असतानाच, शहरात आणखी एका थरारक हत्याकांडाने खळबळ उडवून दिली आहे.