जयरामगडमधून माता अन् ३ वर्षांचा चिमुरडा बेपत्ता

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): जयरामगड (ता.खामगाव) येथून २२ वर्षीय विवाहित महिला आपल्या ३ वर्षांच्या मुलासह बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. जयरामगड येथील अफिश बाबुराव पवार यांची बहीण अंजना शिवदास चव्हाण (वय २२ वर्षे) ही गेल्या १५ दिवसांपासून नाशिक येथे कामासाठी गेली होती. ८ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास ती दुकानावर जाते, असे सांगून घराबाहेर पडली. मात्र, घरी परतलीच नाही. तिच्यासोबत तिचा ३ वर्षांचा मुलगा आरप शिवदास चव्हाण हा देखील होता. भावाने नातेवाईकांकडे, गावात तिचा शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. अंजनाचा रंग निमगोरा, बांधा सडपातळ, उंची ५ फूट असून तिने अंगात निळसर रंगाचा पंजाबी ड्रेस, गळ्यात काळ्या मण्यांची पोत घातलेली आहे. या प्रकरणी हिवरखेड पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली आहे. या माय-लेकाबाबत काही माहिती मिळाल्यास हिवरखेड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अंमलदार रामेश्वर राठोड यांनी केले आहे.
देऊळगाव राजातून १९ वर्षीय तरुणी बेपत्ता
देऊळगाव राजा : देऊळगाव राजा शहरातील प्रतापनगर भागात राहणारे फर्जानाबी सैयद हनीफ यांची मुलगी सानियाबी हनीफ सैयद (वय १९ वर्षे) ही ५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास गावातून सामान आणते, असे सांगून घरातून बाहेर पडली. बराच वेळ लोटूनही ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. त्यामुळे फर्जानाबी सैयद हनीफ यांनी ८ फेब्रुवारी रोजी देऊळगाव राजा पोलीस स्टेशन गाठून मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी मिसिंग दाखल केली आहे. सानियाबीचा रंग गोरा रंग, उंची ५.५ फूट, मजबूत बांधा असून तिने काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार मुसा, गजानन काकड हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!