धाडचे डॉ.रिझवान खान यांना दिल्लीत ‘पद्मरत्न सन्मान २०२६’ प्रदान

अभिनय बोर्डे
धाड,(प्रतिनिधी): शिक्षणाप्रती समर्पण आणि निस्वार्थ समाजसेवेच्या जोरावर महाराष्ट्राचा लौकिक राष्ट्रीय स्तरावर उंचावणारे, बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथील रहिवासी डॉ. रिझवान झेड. खान यांना प्रतिष्ठित “पद्मरत्न सन्मान पुरस्कार २०२६” देऊन सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे १४ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात हा गौरव करण्यात आला.
राष्ट्रीय स्तरावरील १८ मान्यवरांत समावेश नामांकित ‘किंग्ज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ या संस्थेतर्फे दरवर्षी भारतातील विविध राज्यांमधून उत्कृष्ट सामाजिक आणि शैक्षणिक कार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड केली जाते. यंदा संपूर्ण भारतातून केवळ १८ व्यक्तींना या बहुमानासाठी निवडण्यात आले होते, ज्यात महाराष्ट्रातून डॉ. रिझवान खान यांनी आपले स्थान निश्चित केले.
भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी डॉ.आर.डी.मीना, भारतीय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनुराग सक्सेना, ‘मिसेस इंडिया वर्ल्ड’ अश्मित कौर, आंतरराष्ट्रीय मानसिक प्रशिक्षक डॉ. महेश गौर आणि किंग्ज बुक ऑफ रेकॉर्ड्सचे संचालक डॉ. पंकज खटवानी यांच्या हस्ते डॉ. खान यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. रिझवान खान हे सध्या धाड येथील ‘नॅशनल पब्लिक स्कूल ऑफ स्कॉलर्स अँड ज्युनियर कॉलेज’चे अध्यक्ष म्हणून शैक्षणिक धुरा सांभाळत आहेत. शिक्षणासोबतच राजकारण आणि समाजकारणातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असून, एक प्रभावी सामाजिक परिवर्तक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या या निरंतर कार्याची दखल घेत त्यांना या सन्मानाने गौरविण्यात आले आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या या यशाने बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!