अभिनय बोर्डे
धाड,(प्रतिनिधी): “जय श्रीराम…” च्या गगनभेदी गर्दीत, बेंजोचा दणदणाट, हातात फडकणारे भगवे ध्वज आणि आसमंत व्यापून टाकणारा रामभक्तांचा उत्साह… निमित्त होते धाडनगरीत साजरा झालेल्या प्रभू श्रीरामचंद्र जन्मोत्सवाचे! २६ मार्च रोजी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाची जयंती धाडमध्ये ज्या पद्धतीने साजरी झाली, त्याने केवळ भक्तीचा महासागरच लोटला नाही, तर आजवरच्या गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढून एक नवा इतिहास रचला.

उत्सवाची सुरुवात सकाळी स्थानिक वॉर्ड क्रमांक ६ मधील पुरातन श्रीराम मंदिर संस्थानमध्ये मोठ्या भक्तिभावाने झाली. मंदिर समितीचे अध्यक्ष सुभाजी जाधव, सचिव नाना माळोदे आणि बालाजी माळोदे यांच्या नेतृत्वात मंदिराची देखणी सजावट करण्यात आली होती. फुलांची आकर्षक सजावट आणि डोळे दिपवून टाकणारी विद्युत रोषणाई यामुळे मंदिर परिसर एखाद्या वैकुंठासारखा भासत होता.

दुपारी ठीक १२ वाजता रामलल्लाचा जन्मोत्सव सोहळा पार पडला. यावेळी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा छत्रपती शिवशंभू स्मारक समितीचे अध्यक्ष वैभवराजे मोहिते, धाडचे ठाणेदार प्रताप भोस, महिला व बालकल्याण अधिकारी प्रमोद येंडोले, विनोद खडके आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांची महाआरती करण्यात आली. ‘भये प्रगट कृपाला’च्या स्वरांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. आरतीनंतर हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. धाड नगरीत झालेला हा श्रीराम जन्मोत्सव केवळ एक सण नव्हता, तर तो भक्ती, शक्ती आणि एकतेचा एक भव्य आविष्कार होता. या सोहळ्याच्या आठवणी धाडकर अनेक वर्षे आपल्या हृदयात साठवून ठेवतील, यात शंका नाही.

सायंकाळी ६ वाजता धाडनगरीने एक वेगळेच रूप धारण केले. उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश जाधव, अजय शिंदे, वैभव माळोदे, पवन पवार, सुनील शिंदे, सोनू वाघ, निलेश चिंचोले, सचिन नेमाने, ऋषी वाघ, एकनाथ वाघ, आकाश मोरे, विशाल मोरे, गोलू पंडित, सुनील शिंदे, ओम शिंदे, स्वप्निल शिंदे, अजय शिंदे, कृष्णा शिंदे, राहुल बोराडे, गोपाल बोराडे, शिवराज बोराडे, ऋषिकेश बोराडे, अनिकेत बोराडे, बाळू माळोदे, ज्ञानेश्वर माळोदे, अमरसिंग ठाकूर, राम वानखेडे, श्याम वानखेडे, राजू ढोले, शंभू शिंदे, शुभम कांबळे, वैभव कांबळे, लक्ष्मण खेडकर, अनिल खेडकर, अमोल केळोदे, अनिल केळोदे, अभी चिंचोले, गोलू कुरंजे, प्रदीप वाघ, अनिकेत खेडकर, गौरव हिंगे, ऋतिक नादरकर, अनिकेत नेमाने, संजय नेमाने, वैभव सोनूने, स्वप्निल ठाकरे, ओम ठाकरे, राहुल शिरसाठ, कपिल शिंदे, राहुल रोकडे, आकाश तोटे, आशिष तोटे, चैतन्य नेमाने, विजय केळोदे, शाम तोटे, ऋषिकेश आदे, गणेश नेमाडे, उमेश नेमाडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी फुलांनी सजवलेल्या भव्य ट्रॅक्टरमध्ये प्रभू श्रीरामाची देखणी मूर्ती विराजमान करण्यात आली. वैभवराजे मोहिते यांच्या हस्ते सायंकाळची आरती झाली आणि खऱ्या अर्थाने ‘भगव्या वादळाला’ सुरुवात झाली. बेंजोच्या तालावर आणि “राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की” अशा जयघोषात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत शोभायात्रा श्रीराम मंदिर परिसरातून निघाली. जसा जसा काळ पुढे सरकत होता, तसतसा जनसागर वाढतच गेला. तरुणाईच्या अंगात जणू वीरश्री संचारली होती.
मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके
शोभायात्रा जेव्हा ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या हजारो नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. बेंजोच्या तालावर रामभक्तांनी लाठी, काठी आणि तलवारबाजीची अशी काही चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली की, पाहणाऱ्यांच्या अंगावर शहारे आले. जणू काही मावळ्यांचा इतिहासच धाडच्या भूमीत पुन्हा अवतरला होता.
मान्यवरांची उपस्थिती आणि सत्कार
या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक विद्याधर महाले यांनी या शोभायात्रेत प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. त्यांनी प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले, तेव्हा सुभाष जाधव आणि नाना माळोदे यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त आरती करण्यात आली, जो सोहळा उपस्थितांच्या मनावर कायमचा कोरला गेला. त्यानंतर छत्रपती शिवशंभू स्मारक समिती अध्यक्ष वैभवराजे मोहिते, उपाध्यक्ष विशाल विसपुते, किरण सरोदे, गणेश जाधव, वैभव कोप्पे, अजय शिंदे यांनी स्मारक समितीच्या वतीने महाले यांचा सत्कार केला. मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पोहोचताच, वैभवराजे मोहिते आणि ‘हिंदवार्ता’चे तालुका प्रतिनिधी अभिनय बोर्डे यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. हा प्रसंग सामाजिक सलोख्याचे एक उत्तम उदाहरण ठरला.
अप्पर पोलीस अधीक्षकांची उपस्थिती

जुना आठवडा बाजार, सरोदे गल्ली आणि कुंभार गल्लीमार्गे शोभायात्रा हनुमान मंदिर परिसरात आली. याठिकाणी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी स्वतः उपस्थित राहून रामाचे दर्शन घेतले आणि आरती केली. यावेळी वैभवराजे मोहिते यांच्या हस्ते एएसपी गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा हा भक्तिभाव पाहून नागरिकांनी त्यांचे स्वागत केले.
विक्रमी गर्दी आणि नारीशक्तीचा सहभाग
यावर्षीच्या शोभायात्रेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे महिलांची लाभलेली लक्षणीय उपस्थिती. हजारो महिलांनी घरासमोर रांगोळ्या काढून आणि ठिकठिकाणी मूर्तीचे पूजन करून रामाचे स्वागत केले. तरुण-तरुणी रामनामाच्या गीतांवर भक्तीभावाने थिरकताना दिसत होते. धाडच्या इतिहासात आजवर एवढी गर्दी कधीच झाली नव्हती, अशी प्रतिक्रिया जुन्या जाणत्या नागरिकांनी दिली. धर्मजागृती चौक, सराफा गल्ली आणि शेवटी छत्रपती संभाजी महाराज चौकात या ऐतिहासिक सोहळ्याचा समारोप झाला. एवढी मोठी गर्दी असतानाही कुठेही गालबोट लागू नये, यासाठी ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा उत्सव पार पडला.