धाडमध्ये रविवारी रक्तदान शिबिर

धाड,(प्रतिनिधी) : “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान”, असल्याने एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात, या उदात्त हेतूने जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने दरवर्षी प्रमाणे यंदाही जगद्गुरु रामानंदाचार्य संप्रदाय संस्थान तर्फे रविवार ११ जानेवारी रोजी धाड येथील शासकीय विश्राम भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.३० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत शिबिरात रक्त संकलित करण्यात येणार असून रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत रक्ताची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. जगातील तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले असले तरी कृतिम रक्त तयारकरण्याचा शोध अध्यापर्यंत लागलेला नाही. त्यामुळे प्रत्येक सुजाण नागरिकाने सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी रक्तदानासाठी पुढे येण्याची गरज आहे. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र, अल्पोपहार तसेच आवश्यक वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. रक्ताचा तुटवडा दूर करणे तसेच, अपघातग्रस्त, गर्भवती माता, मायक्रो साईटिक, ॲनिमिया, सिकलसेल, थॅलेसिमिया, हिमोफिलिया, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर, अशा गंभीर आजारांशी झुंजणाऱ्या रुग्णांचा जीव वाचवणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

     त्यामुळे या उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते, युवक, विद्यार्थी, व्यापारी वर्ग तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पश्चिम विदर्भ उपपीठ इंजिनिअर प्रमुख दिपक चिंचोले, जिल्हा निरीक्षक लताताई चिंचोले, जिल्हा अध्यक्ष गणेश खडोळ, जिल्हा महिला अध्यक्ष आशाताई निंभोरे, जिल्हा कर्नल संजय हराळ, जिल्हा प्रसिध्दीप्रमुख रमेश गुजर, जिल्हा सचिव प्रविण कऱ्हाळे, जिल्हा अध्यात्मिक प्रमुख सविताताई वाकोडे, तालुकाध्यक्ष रामेश्वर सोनुने, तालुका सचिव सुनिल सिरसाठ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!