भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, तर दोघे गंभीर

छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) : भरधाव वेगात धावणाऱ्या कारने ऑटोरिक्षाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रिक्षाचालकासह वृद्ध महिलेचा मत्यू झाला. तर रिक्षातून प्रवास करणारे अन्य दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. छ्त्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर कुंभेफळजवळ एमआयडीसीच्या लिभेर चौकात ३ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता दरम्यान हा अपघात घडला.
कुंभेफळजवळ एमआयडीसीकडून एमएच-४८-एडब्ल्यू-०५६४ क्रमांकाची कार भरधाव वेगात छत्रपती संभाजीनगरकडे येत होती. तर एमएच-२१-बीजी-०९८१ क्रमांकाचा ऑटोरिक्षा देखील जालण्यावरून प्रवासी घेऊन छत्रपती संभाजीनगरला येत होता. लिभेर चौकाजवळ ya भरधाव कारने रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती, की ऑटोरिक्षा हवेत उंच उड्रन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळला. यामध्ये रिक्षाचालक चिंतामणी जोतिराम वाहळे (वय ३६ वर्षे) रा. कैकाडी मोहल्ला, जालना आणि रिक्षातील प्रवासी वद्ध महिला इंदराबाई भावराव कोल्हे (वय ८२ वर्षे) रा कडेगाव ता. बदनापूर, जि. जालना यांचा मृत्यू झाला. तर ओंकार बाळ बागल (वय १८ वर्षे) रा. लाडगाव ता. छत्रपती संभाजीनगर व संतोष रमेश भटळे (वय २५ वर्षे) रा. कडेगाव ता. बदनापूर जि.जालना हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
अपघाताच घडताच नागरिकांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली. लोक येताना बघून कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळ पंचनामा केला. तसेच बऱ्याच वेळ विस्कळीत झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!