रक्तदान: धाड पोलिसही झाले सोशल!

धाड,(प्रतिनिधी): “जसा राजा,तशी प्रजा”, ही म्हण आपल्याकडे प्रचलित असून बुलढाणा पोलीस दलाचा राजा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे आणि कायदा व सुव्यवस्थेची जबदारी उत्कृष्टरित्या सांभाळणारे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या सोशल पोलिसिंगचे वारे आता हळू हळू जिल्हाभर वाहताना दिसत आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केवळ बंदोबस्त आणि कायदा सुव्यवस्थाच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपण्यातही पोलीस दल सदैव तत्पर असते, याची प्रचिती देण्यासाठी धाड पोलीस स्टेशन धाड आणि पोलीस पाटील संघटनेच्या वतीने २६ जानेवारी रोजी केलेले भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन त्याचीच प्रचिती देणार ठरत आहे.

प्रजासत्ताक दिनी केवळ ध्वजारोहण करून न थांबता, समाजाप्रती असलेले आपले उत्तरदायित्व पार पाडण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या हस्ते सकाळी १० वाजता या शिबिराचे उद्घाटन होणार असून अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून पोलीस दलाने अशा सामाजिक उपक्रमात पुढाकार घेणे ही कौतुकास्पद बाब मानली जात आहे. या उपक्रमामुळे पोलीस आणि जनता यांच्यातील नाते अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.
या शिबिरात पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ठाणेदार प्रताप भोस, पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे, तसेच पोलीस पाटील संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!