रामचरण-उपासनाच्या घरी जुळ्या मुलांचा जन्म 

मुंबई:साउथ सुपरस्टार रामचरण दुसऱ्यांदा वडील झाले आहेत. त्यांची पत्नी उपासनाने ३१ जानेवारी रोजी हैदराबादमधील एका खाजगी रुग्णालयात जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. रामचरणचे वडील चिरंजीवी यांनी सांगितले आहे की, बाळं आणि आई दोघेही निरोगी आहेत.

चिरंजीवी यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर लिहिले आहे, “अत्यंत आनंद आणि कृतज्ञतेने भरलेल्या अंतःकरणाने, आम्हाला हे कळवताना आनंद होत आहे की, रामचरण आणि उपासना यांना जुळ्या मुलांचा आशीर्वाद मिळाला आहे, एक मुलगा आणि एक मुलगी.”

पुढे चिरंजीवीने लिहिले आहे की, “दोन्ही मुले आणि आई निरोगी आणि ठीक आहेत. आजी-आजोबा म्हणून या लहान पाहुण्यांचे आमच्या कुटुंबात स्वागत करणे हा आमच्यासाठी शुद्ध आनंद आणि दैवी आशीर्वादाचा क्षण आहे. आम्ही सर्वांच्या प्रार्थना, प्रेम, आशीर्वाद मनापासून धन्यवाद देतो.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!