अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी) : घराशेजारी राहणाऱ्या एका ५० वर्षीय विकृत मानसिकतेच्या नराधमाने नात्यातील विश्वासाला तडा देत एका ५ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केला. धक्कादायक आणि तेवढीच संतापजनक घटना शहरातील शिवाजी नगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सतीफैल भागात उघडकीस आली. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
खामगाव शहरातील सतीफैल भागात राहणारी ५ वर्षांची बालिका ही घराशेजारी राहणारे आरोपी संतोष रामदास पवार (वय ५० वर्षे) यांच्या घरी खेळायला जायची. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ ते २.३० वाजेच्या सुमारास सदर बालिका नेहमीप्रमाणे आरोपीच्या घरी खेळायला गेली. पीडिता घरी परतल्यानंतर तिची अवस्था पाहून आईला संशय आला. आईने विश्वासात घेऊन विचारणा केली असता, “संतोष नानूने माझी पॅन्ट काढली आणि माझ्या गुप्तांगाला स्पर्श केला,” असे त्या चिमुरडीने आईला सांगितले.
तसेच, “संतोष नानू नेहमीच मला असे करायला लावतात आणि कोणालाही सांगू नको म्हणून धमकावतात,” अशी भीतीदायक माहितीही बालिकेने दिली. सुरुवातीला बदनामीच्या भीतीने आणि कौटुंबिक चर्चेमुळे तक्रार देण्यास विलंब झाला, मात्र शेवटी पीडितेच्या आईने पोलीस स्टेशन गाठून या प्रकरण दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजी नगर पोलिसांनी आरोपी संतोष रामदास पवार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ६४ (२)(आय), ६४ (२)(एम), पोक्सो कायद्याचे कलम ४ आणि ८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कोमल शिंदे ह्या करीत आहेत.