
अकोला,(प्रतिनिधी) :
रस्त्यावर धावणाऱ्या मारुती ओमीनी कारमधील गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. स्फोटामुळे उसळलेला आगडोंब बघून एकच खळबळ उडाली. तब्बल दोन तास चाललेले हे भयानाट्य २२ डिसेंबर रोजी ५.१५ वाजता दरम्यान बाळापूर (जि.अकोला) येथील अंजुमन रोडवर घडले.
बाळापूर शहरातील अंजुमन रोडवर दाट लोकवस्ती असून व्यावसायिकांची दुकाने आहेत. २२ डिसेंबर रोजी ५.१५ वाजता दरम्यान आधीच अरुंद असलेल्या या रस्त्यावरून धावणाऱ्या मारुती ओमीनी वाहनातील गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. त्यामुळे मोठ-मोठ्या आगीच्या ज्वाळा उसळल्या. या ज्वाळा बघून लोकांची मोठी पळापळ सुरू झाली. तसेच रस्त्याच्या दुतर्फा बाजूस असलेल्या घरातील नागरिकही आपला जीव वाचविण्यासाठी घरातून सुरक्षित ठिकाणी सैरा-वैरा पळत सुटले. आग मोठ्या प्रमाणात असल्याने गाडीचे टायर फुटले आणि आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे शहरात सर्वत्र नुसता धुरच धूर दिसून येत होता. डॉ. फैय्याज हुसैन यांनी बाळापूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी अग्निशमन दल आणि विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीचा भडका रस्त्यालगत असलेल्या बाबा रंगारी आणि मोदी यांच्या घरात घुसल्याने त्यांच्या घरातील इलेट्रिक सर्विस लाईन पूर्णतः जळाली. तब्बल दिड ते दोन तासांच्या संघर्षानंतर आग आटोक्यात आली. मात्र, मारुती गाडी पूर्ण जळून राख झाली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही,हे विशेष!
गाडीतील सिलिंडरचा स्फोट
घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, सदर ओमिनी कारमध्ये गॅस सिलेंडर होता. आग लागल्यानंतर गाडीच्या टायरचा आणि सिलेंडरचा स्फोट झाला. त्यानंतर पोलिसांनी आणि स्थानिकांनी तात्काळ आजुबाजूचा परिसर रिकामा करायला सुरुवात केली. मात्र, बघ्यांची गर्दी वाढतच गेली. सुदैवाने, दिड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, तोपर्यत ओमिनी कार पर्णपणे जळन राख झाली होती. या घटनेत मोठी जीवितहानी झाली नाही.
बेकायदा गॅस किटचा ऐरणीवर
शहरात अनेक गाड्यांमध्ये बेकायदेशारपणे घरगुती गॅस सिलेंडर वापरले जातात. या घटनेमळे अशा वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असन, गाडीत नक्की कोणता सिलेंडर होता आण आगीचे नेमके कारण काय होते याचा तपास सुरू केला आहे


