क्राईम जगत

पाच महिन्याच्या गर्भवतीची आत्महत्या

पतीसह सासु-सासऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

डोणगाव, (प्रतिनिधी) :
सासरवरुन पैसे आणण्यासाठी तगादा लावणाऱ्या पती, सासू व सासऱ्याचा शारीरीक व मानसिक त्रास असाह्य झाल्याने एका पाच महिन्याच्या गर्भवतीने विहिरीत उडी घेऊन आपली जिवनयात्रा संपविल्याची खळबळजनक घटना आज २३ डिसेंबरच्या सकाळी माळेगाव (ता.मेहकर) येथे उघडकीस आली. या प्रकरणी माहेरच्या मंडळीने दिलेल्या फिर्यादीवरुन जानेफळ पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
वाकद वाडी (ता.मालेगाव जि.वाशिम) येथील रहिवासी असलेल्या साधना (वय २१ वर्षे) हीचा विवाह २०२४ मध्ये जानेफळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या माळेगाव (ता. मेहकर) येथील विष्णू रामाभाऊ चोडकर याच्यासोबत झाला होता. विवाहाच्या सुरुवातीचे काही दिवस विष्णुने साधनासोबत सुखाने संसार केला. त्याच्यापासून तीला गर्भधारना देखील झाली. मात्र, कालांतराने पती विष्णु व सासु-सासऱ्याकडून साधनाला शारिरीक व मानसिक त्रास सुरु झाला. हा त्रास असाह्य झाल्याने साधनाने आज २३ डिसेंबरच्या सकाळी गावातीलच सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच जानेफळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळ पंचनामा करुन मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. तोवर साधनाच्या माहेरील (वाकद वाडी जि.वाशिम) येथील नातेवाईकांनी माळेगाव गाठून मुलीला सासरच्या मंडळीकडून त्रास असल्याने तीने आत्महत्या केल्याचे सांगत जोवर गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक करत नाही, तोवर मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भुमिका घेतली. त्यामुळे बराव वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन मोठ्या तत्परतेने सासू शोभा रामभाऊ चोडकर व सासरा रामभाऊ चोडकर याला माळेगाव तर पती विष्णू चोडकर याला ठाणेदार अजिनाथ मोरे, पोलीस उप निरीक्षक संतोष जाधव, पोलीस अंमलदार मोहन सावंत, विशाल धोंडगे, विष्णू यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे अहिल्यानगर येथून अटक केली. नातेवाईकांच्या संमतीने साधनाचा मृतदेह मेहकर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर माहेरच्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!