खेळ व मनोरंजन

मे.ए.सो.च्या विद्यार्थ्यांचा विज्ञान प्रदर्शनीत बोलबाला

विद्यालयाकडून जंगी सत्कार

मेहकर,(प्रतिनिधी):
तालुक्यातील हिवरा आश्रम येथे पार पडलेल्या विज्ञान प्रदर्शनीमध्ये मे.ए.सो हायस्कूलच्या विद्यार्थानी घवघवीत यश मिळविले.
विवेकानंद नगर( हिवरा आश्रम) येथील विवेकानंद ज्ञानपीठ येथे १५ व १६ डिसेंबर रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले. या विज्ञान प्रदर्शनीमध्ये मे.ए.सो हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन घवघवीत संपादन केले. प्रश्नमंजुषा या प्रकारामध्ये ऋतुजा गणेश शिंदे वर्ग ९ वा हिने ९ ते १२ या वयोगटांमध्ये सहभाग घेऊन प्रथम क्रमांक मिळवला. तर उपकरण निर्मिती या प्रकारामध्ये अर्णव प्रमोद मुळे वर्ग पाचवा याने द्वितीय तर अनामिका रिंढे यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. भाषण स्पर्धेमध्ये हर्ष पाचरणे याने द्वितीय क्रमांक तर निबंध स्पर्धा या गटामध्ये शैलेश आढागळे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामध्ये त्यांचे विज्ञान शिक्षक विलास धोंडगे, विठ्ठल जाधव,प्रसन्न महाजन कल्पना मुळे, रती अवस्थी, रामेश्वर तेजनकर, देशपांडे, ठोकरे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल तसेच ऋतुजा गणेश शिंदे या ९ वी च्या विद्यार्थिनींने होमी भाभा बाल वैज्ञानिक या परीक्षेमध्ये यश मिळवून प्रात्यक्षिक फेरी साठी पात्र ठरल्याबद्दल संस्थाध्यक्ष हर्षल सोमण, उपाध्यक्ष संजय देशमुख, सचिव प्रमोद मुळे, सचिव निरज देशपांडे, कोषाध्यक्ष वंदना दीक्षित, संचालक कुशल अवस्थी, मोहन ठोसर तसेच प्राचार्य उमाताई जोशी, उपप्राचार्य पंकज किंबहुने व पर्यवेक्षक राजेश अवस्थी यांनी त्यांचा सत्कार केला.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!