Uncategorized

रेती माफियांचे कंबरडे मोडले; पावणे दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

कोटेश्वर–जमनापुरी घाटात धडक कारवाई, ८ टिप्पर जप्त

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी) :
अवैध रेती उपसा व वाहतुकीमुळे शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या रेती माफियांना प्रशासनाने जोरदार दणका दिला आहे. २४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजता कोटेश्वर–जमनापुरी घाट (नरवेल) येथे महसूल व पोलीस विभागाने संयुक्त धडक कारवाई करत रेतीने भरलेले तब्बल आठ टिप्पर पकडले. या जप्त कारवाईची अंदाजे किंमत सुमारे १ कोटी ६२ लाख रुपये असल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात रेती माफियांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील अँक्शन मोडवर आले असून त्यांच्या आदेशाने आणि मलकापूर उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार समाधान सोनवणे, मलकापूर शहर ठाणेदार गिरी, नायब तहसीलदार प्रवीण घोटकर, मंडळ अधिकारी कुलवंतसिंग राजपूत, मंडळ अधिकारी व्ही.एन.कोल्हे, तलाठी धीरज जाधव, राहुल खर्चे, महसूल सेवक पंकज जाधव, सचिन चोपडे तसेच पोलीस आरसीबी पथकाने थेट मैदानात उतरून एमएच-२८बीबी-४१७२, एमएच-२८बीबी-८९१०, एमएच-२८बीबी-२८९५, एमएच-२८बीबी-६१७४, एमएच-२८बीबी-७३९७, एमएच-२८बीबी-४४१४, एमएच-२८बीबी-१२१० आणि एमएच-२८बीबी-७९३५ क्रमांकाच्या टिप्परवर ही कारवाई करत रेती माफियांची चांगलीच मुस्कटदाबी केली असून एकूण ८ टिप्पर जप्त करण्यात आले आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!