क्राईम जगत

चिखलीत शिवरायांचा अवमान; शिवभक्त आक्रमक

गुन्हा दाखल; विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात

चिखली,(प्रतिनिधी):

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल विशिष्ट समाजातील समाजकंटकाने आक्षेपार्ह वक्तव्य केले. नव्हेतर तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावल्या. तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याने ठाणेदार भूषण गावंडे यांनी तत्परता दाखवत तत्काळ तपासचक्रे फिरवली आणि विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

चिखली शहरातील रहिवाशी असलेल्या एका विधी संघर्षग्रस्त बालकाने त्याच्या इंस्टाग्राम सोशल मीडियाच्या माध्यमातून अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह विधाने केली आहेत. या प्रकारामुळे शिवप्रेमींमध्ये आणि हिंदू समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. बघता बघता शेकडो शिवभक्त रस्त्यावर उतरले. नव्हेतर सकल हिंदू समाजबांधवांच्या वतीने चिखली पोलिसांना निवेदन सादर करण्यात तसेच त्याला साथ देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना तत्काळ अटक करून त्यांची सखोल चौकशी व्हावी, अशा घटना घडवून सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम करणाऱ्याचा मास्टर माईंड कोण आहे?, त्याचा शोध घेऊन या विधानांमागे नेमका कोणाचा हात आहे?, आणि कोणाच्या चिथावणीवरून हे कृत्य केले जात आहे?, याचा शोध घेण्यात यावा व आरोपींवर तात्काळ कठोर गुन्हे दाखल करण्यात यावे. समाजात जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा प्रवृत्तींना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली.
ही बाब गांभीर्याने घेत ठाणेदार भूषण गावंडे यांनी उपरोक प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ प्रमाणे गुन्हा दाखल केला. नव्हेतर विधी संघर्षग्रस्त बालकाची तांत्रिक माहिती काढली. तात्काळ तपासचक्रे फिरवीत उपरोक्त गुन्ह्यातील विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!