
छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) :
नियम तर तोडायचा, गुन्हाही करायचा, पण पकडल्या जाता कामा नये, म्हणून त्याने शक्कल लढवली.पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी इकडे तिकडे नाही,तर चक्क घरातच कत्तलखाना उघडला. पण, रक्त मांसाचा पडलेला सडा,आणि सुटलेल्या दुर्गंधीमुळे त्याचा घडा भरला. आणि पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात “कसायाचा” पर्दाफास झाला. नव्हेतर गोहत्या करून मांस विकणाऱ्यास पोलिसांनी बेड्या ठोकण्याची घटना नुकतीच छत्रपती संभाजीनगरस्थित चिकलठाणा परिसरात समोर आली.
सिडको एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या चिकलठाण परिसरात आरोपी गप्फार कुरेशी याचे घर आहे. त्याने आपल्या घरातच अवैध कत्तलखाना उघडल्याची गुप्त माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलीस आयुक्त मनोज पगारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गीता बागवडे, पोलीस उपनिरीक्षक लखनसिंग पचलोरे, पोलीस अंमलदार संजय नंद, प्रकाज सोनवणे. संतोष गायकवाड, परशुराम सोनुने, रतनसिंग नागलोत, महिला पोलीस अंमलदार गौरी भंडारी यांनी सापळा लावून उपरोक्त ठिकाणी धाड टाकली.
पोलिसांनी घरात प्रवेश करताच आरोपी गप्फार कुरेशी याने धिंगाणा घालायला सूरुवात केली. मात्र, लेडी सिंघम म्हणून परिचित असलेल्या पोलीस निरीक्षण गीता बागवडे यांनी आरोपीला न जुमानता आपल्या सहकाऱ्यांसह घरचा कानाकोपरा धुंडाळला. त्यावेळी घरातील हौदात हाडांचा मोठा साठा आणि रक्त दिसून आले. तसेच घराच्या बाल्कनीतदेखील कापलेल्या जनावरांचे अवशेष विखरलेले मिळून आहे. तसेच धारदार कानस, सुरे, कुऱ्हाडसह १३ कोयते आणि चाकू असे घातक हत्यार मिळून आली. तर घरातील विविध डब्यांमध्ये आणि पॉलिथिन पिशव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कापून ठेवलेले गोमांसही मिळून आले. पोलिसांनी ३५ जनावरांचे अवशेष जप्त केले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किचनमध्ये बांधला होता हौद
या कसायाने आपल्या राहत्या घरातच कत्तलखाना सुरू केला होता. नव्हेतर किचनमध्ये बांधलेल्या हौदातच तो गोवंशांच्या कत्तली करत असल्याची बाब समोर आली. यावेळी आरोपीने पोलिसांसोबत वाद घालण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही, तर आत्महत्येची धमकी दिली. मात्र,पोलिसांनी त्याच्या धमक्यांना भीक न घालता पोलीस खाक्या दाखवत चांगलीच वरात काढली.
७०-८० गोवंशाची कत्तल?
वडोद बाजार येथून आरोपीने गोवंश खरेदी केल्या असून अंदाजे ७० ते ८० गोवंशाची कत्तल केल्याची माहिती पोलिसांनी दिली असून आरोपी गप्फार कुरेशीविरुद्ध गून्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे


