पर्दाफाश! आंतरजिल्हा दुचाकी चोरांचा
तीन चोरट्यांना ठोकल्या बेड्या; चार मोटारसायकल जप्त; एलसीबीची कामगिरी

पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी जिल्ह्यात घडलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा करून चोरट्यांना जेरबंद करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी पोलीस उपनिरीक्षक सपकाळे, पोलीस अंमलदार दीपक लेकुरवाळे, एजाज खान, राजेंद्र अंभोरे, अरविंद बडगे, अमोल शेजोळ, अजीस परसूवाले, तांत्रिक शाखेचे पोलीस अंमलदार ऋषिकेश खंडेराव याचे पथक गठित केले. नव्हेतर पथकाने अंबुलकर यांच्या आदेशान्वये बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला.
दरम्यान, मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने तीन संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. चौकशी दरम्यान आरोपींनी बुलढाणा शहर, बोरखेडी (जि.नागपूर) आणि नालासोपारा (मुंबई) येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली.


