महाराष्ट्र माझा

मुक्त विद्यापीठ हिवाळी परीक्षा : ऑनलाईन गृहपाठ सादरीकरणास ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ!

   नाशिक,(प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांच्या हिवाळी परीक्षा ७ जानेवारी २०२६ पासून सुरू होत आहेत. जानेवारी व जुलै सत्रात प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर शिक्षणक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन गृहपाठ सादर करण्यास ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
         विद्यार्थ्यांना त्यांचे सातत्यपूर्ण मूल्यमापन/अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक असलेले गृहपाठ ऑनलाईन अपलोड करण्याची कार्यप्रणाली विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्र–कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या नियोजनानुसार परीक्षा विभागाने विकसित केलेली आहे.
     विद्यार्थ्याने आपल्या कायम नोंदणी क्रमांकाच्या (पीआरएन) आधारे लॉगीन करून, विषयनिहाय वैयक्तिक माहिती असलेली उत्तरपुस्तिका डाऊनलोड करून या उत्तरपुस्तिकेमध्ये असलेल्या गृहपाठाचे प्रश्न आपल्या हस्ताक्षरामध्ये लिहून त्या पीडीएफ स्वरुपात पोर्टलवर विषयनिहाय अपलोड करायच्या आहेत. मुदतीत गृहपाठ सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित विषयात अनुपस्थित दर्शवून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
       अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी ८०७११८८७८९, ८००७२५३०४४, ८०५५२५३०७२ या मदत क्रमांकावर संपर्क साधावा. ऑनलाईन गृहपाठ सादरीकरणासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना, कार्यपद्धती तसेच संबंधित शिक्षणक्रमांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर http://asm.ycmou.org.in/ उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत गृहपाठ सादर करून सूचनांचे पालन करावे, असे आवाहन परीक्षा विभागातर्फे करण्यात आले आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!