क्राईम जगत

खबरदार:विना परवाना दारुविक्री कराल तर!

नववर्षाच्या पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा इशारा;सरत्या वर्षात एक कोटी ८८ लाखांचा मुद्देमाल जप्त

       बुलढाणा,(प्रतिनिधी): नववर्षाच्या आगमनाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील विविध भागात अवैध वाहतुक तसेच विक्री मोठ्या प्रमाणात होतात. अशा घटनाना प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत ३१ डिसेंबरपर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.  तथापि कोणत्याही अनुज्ञप्तीमध्ये विना परवाना मद्यविक्री किंवा अल्पवयीन तरुणांना दारु उपलब्ध होत असल्यास अशावर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच नागरिकांना देखील काही तक्रारी असल्यास विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चारुदत्त हांडे यांनी केले आहे.
    नाताळ व नववर्ष आगमनाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क बुलढाणा कार्यालयाच्यावतीने अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्री वर प्रतिबंध घालण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील कार्यक्षेत्रीय अधिकारी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बुलढाणा, राज्य उत्पादन शुल्क देऊळगाव राजा व राज्य उत्पादन शुल्क खामगाव व राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक यांच्याकडून जिल्ह्यातील विविध हातभट्टी ठिकाण, अवैध मद्यविक्री केंद्रावर छापे टाकुन कारवाई करणे चालु आहे. तसेच नववर्षाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात येणाऱ्या पार्ट्या, हॉटेल्समध्ये होणारी मद्यविक्री यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध विक्री, मद्यनिर्मीती व वाहतुक प्रकरणी १ मार्च २०२५ पासून ते आजपर्यंत विशेष मोहिम राबवून एम कोटी ८८ लक्ष ६३ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये एक हजार २०१ व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ८२ वाहन जप्त करण्यात आले आहे.
दहा दिवसांत १३ लक्ष ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त
बुलढाणा जिल्ह्यातील हातभट्टी ठिकाणे व अवैध मद्यविक्री केंद्रावर २१ ते ३० डिसेंबर या कालावधीत छापे घालुन ६२ गुन्हे नोंदविले असुन ५९ आरोपींना अटक केली आहे. सदर गुन्ह्यात एकुण ७ वाहने जप्त केली असुन या गुन्ह्यांत एकुण १३ लाख ३१ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!