क्राईम जगत

नांदुऱ्यात विवाहितेचा गळा दाबून विषारी औषध पाजले

पतीसह सासरच्या चौघांवर गुन्हे दाखल

नांदुरा,(प्रतिनिधी) : शेगाव तालुक्यातील कठोरा येथे पतीसह सासरच्या लोकांनी विवाहितेचा गळा दाबून उंदिर मारण्याचे औषध पाजले. ९ डिसेंबर रोजी ही घटना घडली. उपचारानंतर विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून जलंब पोलिसांनी पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध १ जानेवारीला गुन्हा दाखल केला.

प्रतीक्षा उज्वल लाहुडकार (वय २०) असे विवाहितेचे नाव आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील लोहारा येथे वास्तव्यास असलेली प्रतीक्षा शेगाव तालुक्यातील कठोरा येथे आपल्या घरी आली होती. ९ डिसेंबर रोजी तिला सासरच्यांनी मारहाण केली. सासरचे लोक नेहमीच छळ करीत होते. सासरा व दिराने तिचे हातपाय पकडले. तर सासूने उंदिर मारण्याची पुडी एका कपामध्ये टाकून पतीने गळा दाबून तोंडात विष ओतले. पतीसह सासरच्यांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला. प्रतीक्षाला उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले होते. दरम्यान, १ जानेवारी रोजी दिलेल्या तक्रारीवरून जलंब पोलिसांनी पती उज्वल रमेश लाहुडकर (वय ३० वर्षे), सासरा रमेश लाहुडकर (वय ६० वर्षे), दीर ज्ञानेश्वर उर्फ मुन्ना रमेश लाऊडकर (२०) व सासू शोभा रमेश लाहुडकार (५५) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९, १५, ११५ (२) १५२, ३ (५) नुसार गुन्हे नोंदविण्यात आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरवाडे करीत आहेत.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!