क्राईम जगत

चांगेफळ: अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडले

संग्रामपूर,(प्रतिनिधी) : महसूल विभागाच्या पथकाने रेतीची अवैध वाहतूक करणारा टिप्पर पकडल्याची घटना ३ जानेवारीच्या रात्री ८.३० वाजता दरम्यान चांगेफळ फाटा रस्त्यावर घडली.
चोहीकडे रेतीची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरु आहे. दरम्यान, ३ जानेवारीच्या रात्री ८.३० वाजता दरम्यान नायब तहसिलदार विकास शिंदे, एन.टी.राहुल वसावे, महसुल अधिकारी अविनाश खरे, महसुल अधिकारी संतोष खारोले यांना एमएच-२८-बीबी-८१०६ क्रमांकाचे टिप्पर रेतीची वाहतूक करतांना दिसले. पथकाने सदर टिप्पर थांबवून रेती वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारणा केली असता, टिप्परचालकाकडू परवाना तसेच कोणतेच कागदपत्रे मिळून आले नाही. पथकाने घटनास्थळ पंचनामा करुन संदिप गावंडे (रा. जळगाव जामोद) याच्या मालकीचे टिप्पर जप्त करुन तामगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी दंडात्मक कारवाई प्रस्तावीत आहे. तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या आदेशान्वये पथकाने केलेल्या या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. अवैध रेती वाहतुक करणाऱ्यावर कारवाई सुरुच राहणार असल्याची प्रतिक्रिया तहसीलदार प्रशांत पाटील यांनी  दिली आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!