क्राईम जगत
‘एमआयएम’च्या इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला!
तगडा बंदोबस्त तैनात; बायजीपुऱ्याला छावणीचे स्वरूप

छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) : माजी खासदार इम्तियाज जलील यांनी काढलेल्या प्रचार रॅलीवर बायजीपुऱ्यात हल्ला झाल्याची खळबळजनक घटना आज ७ जानेवारीच्या दूपारी दोन वाजता दरम्यान घडली. या हल्ल्यात जलील यांचे समर्थक आणि विरोधक कार्यकर्त्यात तुफान राडा झाला असून यामध्ये एक कार्यकर्ता जखमी झाल्याचे वृत्त आहे. तर जलील कारमध्ये बसुन असल्याने त्यांना मुक्का मार लागल्याचे बोलल्या जात आहे.
एमआयएम पक्षाचे माजी खासदार अम्तियाज जलील यांनी एका प्रचार रॅलीचे आयोजन केले होते. सदर प्रचार रॅली बायजीपुऱ्यातून जात असतांना तरुणांनी त्यांना काळे झेंडे दाखविले. तसेच जलील यांना धक्काबूक्की करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस प्रशासनाने वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. मात्र, सदर रॅली संपल्यानंतर जलील आपल्या कारमध्ये बसत असतांना आक्रमक झालेल्या काही तरुणांनी अचानक त्यांच्या गाडीवर हल्लाबोल केला. त्यावेळी जलील यांचे समर्थक आणि हल्ला करणारे आमने-ारमने आल्याने पोलिसांनी लाठीचार्ज करून जमाव पांगवला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, आपल्याला या हल्ल्याचा अंदाज होता आणि आपण पोलिसांना तशी माहितीही दिली होती. मात्र, पोलिसांनी योग्य ती काळजी घेतली नसल्याचा आरोप जलील यांच्या समर्थकांनी केला आहे. तर कलीम कुरेशी यांनी त्यांचा आरोप फेटाळून लावत जलील यांनी पैसे घेऊन तिकीट विकल्यामळे त्यांचे बरेच कार्यकर्ते नाराज झालेले आहेत. निवडणूकीत कार्यकर्त्यांची सहाभुती मिळविण्यासाठी त्यांनी स्वत:च हा हल्ला करवून घेतल्याचा अरोप केला आहे. या हल्ल्याशी माझा कोणताही संबंध नसल्याचेही कुरेशी यांनी म्हंटले आहे. घटनेनंतर बायजीपुन्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसराला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.