स्मार्ट बुलढाणा

हभप कैवल्यमहाराजांनी उलगडला ‘काल्याचा’ महिमा

मासरुळ येथे शिवपुराण व हरिनाम सप्ताहाची सांगता

मासरुळ,(प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षांपासून अध्यात्म आणि भक्तीचा वारसा जपणाऱ्या मासरुळनगरीत आयोजित ‘शिवमहापुराण कथा व अखंड हरिनाम सप्ताहाची’ मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात सांगता करण्यात आली. श्रीक्षेत्र अनवे पंढरपूर संस्थानचे प.पू. सद्गुरु ज्ञानेश्वरमाऊली महाराज चातुर्मास्ये यांच्या मंगल उपस्थितीत या सप्ताहाचा समारोप हभप कैवल्य महाराज चातुर्मास्ये यांच्या रसाळ व मधूर वाणीतून झालेल्या ‘काल्याच्या कीर्तनाने’ करण्यात आला.

कैवल्य महाराजांनी कीर्तनसेवेसाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा ‘पाहातां गोवळी । खाय त्यांची उष्टावळी ॥’ हा अभंग घेत, ‘गोपाळकाला’ म्हणजे नेमके काय आहे, हे उपस्थित भाविकांना विस्तृतपणे पटवून दिले. कैवल्य महाराजांनी निरूपण करताना सांगितले की, भगवान श्रीकृष्ण चराचराचा स्वामी आहे. असे असतांनाही ते आपल्या गरीब गवळ्यांच्या प्रेमात इतके दंग झाले होते की, त्यांच्या शिदोरीतील उष्टावळी देखील त्यांनी आनंदाने ग्रहण केली. ‘पाहातां गोवळी । खाय त्यांची उष्टावळी ॥’, यातून भगवंताला केवळ ‘भाव’ प्रिय असल्याचे स्पष्ट होते. तिथे श्रीमंत-गरीब किंवा श्रेष्ठ-कनिष्ठ असा कोणताही भेदभाव उरत नाही.

‘करिती नामाचें चिंतन । गडी कान्होबाचें ध्यान ॥’, या चरणावर बोलताना महाराजांनी सांगितले की, ते गोपाळ गाई वळण्याचे कर्म करत असतानाही त्यांचे चित्त मात्र अखंड ‘कान्होबा’मध्येच गुंतलेले होते. आपण संसारात आपली कर्तव्ये पार पाडत असताना देवाचे नामस्मरण कसे करावे, याचा सर्वात मोठा आदर्श म्हणजे हे गोपाळ असल्याचे त्यांनी सांगितले. ‘एके ठायीं काला । तुका म्हणे भाविकाला ॥’, या चरणाचा अर्थ सांगताना महाराजांनी सर्व जाती-धर्माच्या आणि विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन, आपापल्या शिदोऱ्या (अहंकार) एकत्र कालवून जो प्रसाद तयार होतो, तोच खऱ्या अर्थाने ‘काला’ असल्याचे सांगितले. आणि हा काला केवळ साध्या अन्नाचा नसून तो प्रेमाचा आणि समतेचा काला असल्याचेही ते म्हणाले.

आयोजित सप्ताहाच्या सांगताप्रसंगी मासरुळ आणि परिसरातील हजारो भाविकांनी कीर्तनाचा लाभ घेतला. सद्गुरु ज्ञानेश्वर माऊली महाराज चातुर्मास्ये यांच्या दर्शनाने भाविक कृतकृत्य झाल्याचे दिसून आले. टाळ-मृदंगाचा गजर आणि विठ्ठलनामाच्या जयघोषाने मासरुळ नगरीचे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. किर्तनानंतर दहीहंडी फोडून उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. मासरुळसह पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या आनंदात या महाप्रसादाचा लाभ घेतला. सप्ताहाच

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!