स्मार्ट बुलढाणा

अजिंठा बुद्ध विहारात माँसाहेब जिजाऊंना अभिवादन

धाड,(प्रतिनिधी): धाड येथील अजिंठा बुद्ध विहारात राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
धाडच्या प्रथम नागरिक सरपंच सावित्रीबाई सत्यवान बोर्डे, पंचशीलाबाई रवींद्र बोर्डे, पत्रकार अभिनय प्रमोद बोर्डे, पोलीस पाटील नंदाताई प्रमोद बोर्डे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी माँसाहेब जिजाऊंची दूरदृष्टी, कणखर संस्कार आणि स्वाभिमानी विचारधारा यामुळे स्वराज्याची पायाभरणी घडली. आजही जिजाऊंचे चरित्र समाजातील महिलांसाठी धैर्य, कर्तृत्व आणि मातृहृदयाचे अनोखे प्रतीक असल्याचे सांगत त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यानंतर जयंतीनिमित्त अजिंठा बुद्ध विहार अंतर्गत “बुद्ध विहार जोडो अभियान” राबविण्यात आले. महापुरुषांच्या विचारांच्या प्रसारासाठी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी आयोजकांच्या वतीने करण्यात आले.
या अभियानांतर्गत तसेच समतासैनिक दल धाड शाखेच्या निवड प्रक्रियेत अध्यक्षपदी वर्षा जितेंद्र बोर्डे व उपाध्यक्षपदी प्रतिभा गजानन थोरात यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेस धाडचे सरपंच, पोलीस पाटील, ज्येष्ठ उपासिका, धम्मसेवक व धम्मसेविका उपस्थित होत्या. सर्वांच्या वतीने नव्याने निवड झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला आणि राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. प्रवीण शंकर बोर्डे तर आभार वर्षा जितेंद्र बोर्डे यांनी मानले.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!