स्मार्ट बुलढाणा

कॅन्टीनडे साजरा करून विद्यार्थ्यांनी घेतले व्यवहाराचे धडे

५३ हजार रुपयांचा व्यवहारही झाला

चांडोळ,(प्रतिनिधी) : शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच त्यांच्या अंगी व्यावहारिक ज्ञानाचा दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी स्थानिक शरद पवार उर्दू हायस्कूलच्या वतीने आज १४ जानेवारी रोजी आनंद मेळावा पार पडला. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होत विविध खाद्य पदार्थांचे ४० दुकाने लावत, यातून जवळपास ५३ हजार रुपयांची उलाढाल केली.

मुख्याध्यापक सय्यद समीर यांच्या मार्गदर्शनात आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी एकूण ४० खाद्य पदार्थांचे स्टॉल उभारले. मेळाव्याचे उद्घाटन सरपंच सुनिल मेहेर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. आनंद मेळाव्यात पाणीपुरी, खमंग, सँडविच, समोसे, कस्टर, चना मसाला, पापड, कचोरी, पोहे, चहा, बिस्किटे, भेळ, हलवा, कुरकुरे, ढोकळा, पॉपकॉर्न, फ्रूट सलाड यांची दुकाने थाटण्यात आली होती. स्टॉलवरील या चविष्ट पदार्थाची शिक्षकांसह उपस्थित मान्यवरांनी, पालकांनी व शालेय विद्यार्थ्यांनी खरेदी केली. त्यातून शालेय विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञानासोबत मनमुराद आनंद लुटण्याची संधी मिळाली. तसेच दैनंदिन जीवनात व्यवहार कसा करावा, गणितीय आकडेमोड कशी करावी, ग्राहकांना विक्री करतांना कशा प्रकारे सामोरे जावे, या दीर्घकाळ स्मरणात राहणाऱ्या अनुभवाची शिदोरी मिळाली. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक सय्यद समीर, शिक्षक मो.जमील, वहाब, आहद, सय्यद नवेद, रहेमोद्दिन, नदीम, नकित, शिक्षिका शबाना, रुहीना, शिक्षक नदीम, शोहेब जुनेद यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमासाठी, मौलाना अबुल कलाम आजाद एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे सेक्रेटरी एकबाल सौदागर मौलाना, धाड ठाणेदार प्रताप भोस, पोलीस पाटील पंकज देशमुख, सागर जयस्वाल, शिवाजी देशमुख, जामा मस्जिद इमाम मौलाना मुबीन शफी, राजू धनावत, आजाद हायस्कुल धाडचे १०० विघार्थी, ग्रापंचायत उपसरपंच, सदस्य जि.प.उर्दू शाळेचे विद्यार्थी, मॉ जिजाऊ काँनवेटचे विघार्थी, शिक्षक जि.प.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, पत्रकार बांधव तसेच सर्व पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!