शेतशीवार
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत २४ तासांत अनुदान

खामगाव,(प्रतिनिधी): जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणारा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर दुसऱ्या टप्प्यात राज्यातील २१ जिल्ह्यांतील ७ हजार २०१ गावांचा समावेश करण्यात आला आहे. बदलत्या हवामान परिस्थितीशी शेतकऱ्यांना जुळवून घेता यावे व शेती अधिक किफायतशीर व्हावी, हा या प्रकल्पाचा उद्देश आह.
प्रकल्पांतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांना अनुदान वितरणास सुरुवात झाली असून खामगाव तालुक्यातील शेलोडी गावातील शेतकरी भगवानसिंग शामसिंग पवार यांना तुषार सिंचन घटकाचे अनुदान अवघ्या २४ तासांत मिळाले आहे.
पवार यांनी दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी ग्राम विकास कृषी समिती, शेलोडी येथे अर्ज सादर केला होता. त्याच दिवशी समितीची सभा असल्याने अर्जास तात्काळ मान्यता देण्यात आली. सहाय्यक कृषी अधिकारी आसरा कांबळे यांनी तत्काळ कार्यवाही केली, तर तालुका कृषी अधिकारी सुनील पवार यांनी अर्जास पूर्वसंमती दिली.

कांदा पिकासाठी तुषार सिंचन संचाची आवश्यकता असल्याने लाभार्थी शेतकऱ्यांनी त्याच दिवशी संचाची खरेदी केली. दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी उपकृषी अधिकारी पाटेखेडे यांनी स्थळ पाहणी करून प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी सादर केले. प्रभारी लेखाधिकारी विजय खोंदिल, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांच्या माध्यमातून प्रकरण प्रकल्प अंमलबजावणी कार्यालय (मुंबई) येथे पाठविण्यात आल्यानंतर प्रकल्प कार्यालयाने त्याच दिवशी सायंकाळी अर्जाची तपासणी करून शेतकऱ्याच्या खात्यात अनुदान वर्ग केले. इच्छाशक्ती व समन्वय असल्यास शेतकऱ्यांना अल्प कालावधीत अनुदान मिळू शकते, हे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.