स्मार्ट बुलढाणा

मोताळा : ट्रॅक्टरखाली दबून एका युवकाचा मृत्यू,तर दुसरा गंभीर

सहस्त्रमुळी तांडा शिवारातील घटना

मोताळा,(प्रतिनिधी): तालुक्यातील सहस्त्रमुळी शिवारात ट्रॅक्टर पलटी होवून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना १८ जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. मृतकाचे नाव सौरव हरिशचंद्र जाधव असे आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बोराखेडी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सहस्त्रमुळी तांडा शिवारात आज रविवार १८ जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास एमएच-२८-एजे-७२१९ क्रमांकाचे ट्रॅक्टर एका शेतातील तूर काढून दुसऱ्या शेताकडे जात होते. दरम्यान, या रस्त्यावरील एका वळणावर ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर ट्रॅक्टर व हॉर्वेस्टर पलटी झाले. या अपघातात सहस्त्रमुळी तांडा येथील रहिवासी असलेला सौरव हरिशचंद्र जाधव (वय २२ वर्षे) या युवकाचा ट्रॅक्टरखाली दबून दुदैवी मृत्यू झाला. तर महेश मोतेसिंग जाधव (वय २० वर्षे) हा युवक गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी तसेच बोरखेडी पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार नंदकिशोर धांडे, श्रीकांत चिटवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळ पंचनामा करून सौरव जाधव याचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केला. तर जखमी महेश जाधव याला उपचारार्थ भरती केले. या दुर्दैवी घटनेमुळे सहस्त्रमुळी तांडा परिसरात शोककळा पसरली आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!