स्मार्ट बुलढाणा

आश्रु बाबांच्या जयघोषात दुमदुमली संतनगरी

लाखो भाविकांची उपस्थिती : सर्वत्र भक्तीमय वातावरण

किशोर मोरे
दाभा,(प्रतिनिधी): लोणार तालुक्यातील ब दर्जा प्राप्त तीर्थक्षेत्र असलेल्या संतनगरी जाफ्राबाद येथील ४९ व्या भव्य यात्रा उत्सव आश्रु बाबांच्या जय घोषात, भक्तीमय वातावरात १८ जानेवारी २०२६ रोजी पार पडला. यावेळी शेकडो भाविकांनी पुरी, वांगे भाजीच्या महाप्रसादाचा लाभ घेतला. संत आश्रु बाबा महाराजांचा ४९ व्या भव्य यात्रा महोत्सवात दूरवरून भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

प्रारंभी परमहंस अवलीय संत आश्रु बाबा महाराजांच्या मूर्तीची ब्राह्मणवृंद द्वारकाप्रसाद व्यास यांच्या मंत्रोच्यारात, केंद्रीय आयुष आरोग्य मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्या पत्नी राजश्रीताई जाधव, आमदार सिद्धार्थ खरात, सुवर्णाताई खरात. लोणार नगराध्यक्षा मीराताई भूषण मापारी, भूषण मापारी, मेहकर नगराध्यक्ष किशोर गारोळे, माजी आमदार संजय रायमूलकर यांच्या हस्ते संत आश्रु बाबा महाराज यांची महापूजा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर हभप धर्मभूषण रामकृष्ण हाडे गुरुजी यांचे काल्याचे कीर्तन पार पडल. तर मंदिरपासून ते संत अश्रु बाबा महाराजाच्या जन्मस्थळांपर्यंत गावातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कार्यक्रमात सहभागी झालेल्या सामाजिक, राजकीय, धर्मीक विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आ.संजय रामुकर, लोणार नगराध्यक्षा मीराताई भूषण मापारी, मेहकर नगराध्यक्ष किशोर गारोळे, रिसोड मतदार संघाचे आमदार अमित झनक, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा. बळीराम मापारी, लोणार नगर सेवक भूषण मापारी, सभापती माधवराव जाधव, संतोष मापारी, प्रा. आशिष रहाटे, शैलेश सरकटे, दाभा येथील विजय मोरे, सुरेश प्रल्हाद प्रधान यांच्या सह भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरी-भाजीच्या महाप्रसादाचे वाटप
आश्रुबाबा यात्रा महोत्सवात भाविक भक्तांना पुरी-भाजीच्या महाप्रसादचे वाटप करण्यात आले. यावेळी ना. प्रतापराव जाधव, यांच्यापत्नी राजश्रीताई जाधव, आमदार सिद्धार्थ खरात, त्यांच्यापत्नी सुवर्णाताई खरात. नगराध्यक्षा मीराताई मापारी, भूषण मापारी, नगरअध्यक्ष किशोर गारोळे, माजी आ.संजय रायमूलकर, तहसीलदार भूषण पाटील आदींच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी संत अश्रुबाबा संस्थानचे सर्व विश्वस्त डॉ. मारोती मोरे, गजानान सरकटे, अंकुश मुंढे, पंजाब पोघे, गणपतराव भाग्यवंत, महसूल अधिकारी विष्णू केंद्रे, ग्राम महसूल अधिकारी संजाब इंगोले, विजय मोरे, शिवाजी मोरे, भगवानराव सुलताने, पुजारी गणेश महाराज ओव्हर, हभप सदाशिव महाराज मुंढे आदींची उपस्थिती होती.
महिला भजनी मंडळांचा सन्मान
संत आश्रु बाबा महाराज संस्थानच्या वतीने ‘श्री’ची भव्य शोभायात्रा पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संत आश्रु बाबा महाराज वारकरी संस्थनचे बाल वारकरी, परिसरातील महिला वारकऱ्यांचा दिंड्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पालखी सोहळ्यात सहभागी महिला भजनी मंडळ यांचा संस्थानच्या वतीने सन्मान करण्यात आला. तर महिला स्वयंमसेवक, सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल हिरडव येथील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रसाद बारीसाठी परिश्रम घेतले. यावेळी थेट महाप्रसाद वितरणाची जबाबदारी परिसरातील महिला सेवाधारी, सेवकानी नियोजन बध्द पार पाडली. ठाणेदार प्रकाश सदगीर वतीने चोख बंदोबस्त ठेवला होता. प्राथमिक आरोग्य केंद्र हिरडव वतीने डॉ . विपुल तनपुरे यांनी आरोग्य सेवा दिली. आरडव येथील शैलेश सरकटे यांनी भाविकांना मोफत शुद्ध जल वाटप सेवा दिली.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!