स्मार्ट बुलढाणा

मलकापूर: बिबट्याने तोडले तरुण शेतकऱ्याच्या शरीराचे लचके!

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी): आपल्या शेतात पिकाला पणी देण्यासाठी गलेले्या एका तरुण शेतकऱ्यावर दबा धरुन बसलेल्या बिबट्याने जिवघेणा हल्ला चढवत शेतकऱ्याच्या शरीराचे लचके तोडल्याची घटना १८ जानेवारीच्या सायंकाळी घडली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्यावर शासीकय व त्यानंतर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये बिबट्याची प्रचंड दहशत पसरली असून वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

 

पिंपळखुटा बुद्रूक (ता.मलकापूर) येथील रहिवासी असलेले तरुण शेतकरी नितीन सुरेश मालठाणे (वय २८ वर्षे) यांची निमखेड शिवारात शेती आहे. १८ जानेवारीच्या सायंकाळी नितीन मालठाणे स्वत:च्या शेतात लावलेल्या मका पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. शेतकाम करत असतांना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जाळीत दबा धरून बसलेल्या चवताळलेल्या बिबट्याने शेतकरी मानठाणे यांच्यावर अचानक जिवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात मानठाणे गंभीर जखमी झाले. त्यांच्या पोटावर व पायांवर गंभीर जखमा झाल्या. नव्हेतर बिबट्याने त्यांच्या शरीराचे लचके तोडले. मालठाणे यांनी प्रसंगावधान राखत बिबट्याच्या तावडीतून कशीबशी स्वत:ची सुटका केली. तसेच उपचारासाठी उमाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल. यावेळी त्यांच्या पायात बिबट्याचा दात रुतलेला आढळून आला. त्यामुळे वैद्यकी अधिकाऱ्यांनी सदर दात काढून त्यांना पुढील उपचारासाठी मलकापूर येथील खाजगी रुग्णालयात रवाना केले. मालठाणे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सूरु असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीस सुत्रांनी दिली. घडलेल्या या जिवघेण्या घटनेमुळे पिंपळखुटा, निमखेड व आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेतात काम करणे, पिकांना पाणी देणे किंवा संध्याकाळच्या वेळेस शेताकडे जाणेही जिवघेणे ठरत असल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत आहे. वनविभागाने ही बाब गांभीर्याने घेऊन तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावावे, उपरोक्त परिसरात गस्त वाढवावी, तसेच शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!