महाराष्ट्र माझा

बिग ब्रेकिंग: लाडक्या बहिणींना दिलासा! ई-केवायसी चुकलेल्यांना मिळणार लाभ!

अंगणवाडी सेविकांकडून होणार पडताळणी; बँक खात्यात लवकरच पैसेही जमा होणार

बुलढाणा,(प्रतिनिधी): महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी राज्यभरात महिलांच्या आक्रमकतेची चांगलीच दखल घेतली असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक चुका किंवा चुकीचा पर्याय निवडल्या गेल्यामुळे लाभ बंद झालेल्या महिलांची आता प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पात्र महिलांचा लाभ पुन्हा पूर्ववत सुरू होणार असल्याने लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.

सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत सर्व लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला होता. मात्र, पोर्टलमध्ये येणारे तांत्रिक अडथळे आणि माहिती भरताना झालेल्या चुकांमुळे राज्यातील लाखो महिलांकडून चुकून अपात्रतेचे पर्याय चुकून निवडल्या गेले होते. त्यामुळे सदर महिला पात्र असूनही त्यांना गेल्या दोन महिन्यांपासून हप्त्यांचे पैसे मिळणे बंद झाले होते. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी राज्यभरात आक्रमक पवित्रा घेत ठिकठिकाणी आंदोलने केली. आज २० जानेवारी रोजी शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कचेरीवर दस्तक देत रोष व्यक्त केला. याची गंभीर दखल घेत महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी आज २० जानेवारी रोजी राज्यातील सर्व जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांशी तातडीने “व्हीसी”द्वारे  संवाद साधला. नव्हेतर ई-केवायसी चुकलेल्या महिलांची स्वतंत्र यादी तयार करून जशी एका रेशन कार्डवर दोनपेक्षा जास्त महिलांच्या अर्जांची पडताळणी झाली होती, तशीच अंगणवाडी सेविका घराघरात जाऊन ई-केवायसी चुकलेल्या महिलांची खातरजमा करण्यात येणार असून या पडताळणी प्रक्रियेसाठी आठ दिवसांत राज्य शासनाकडून अधिकृत मार्गदर्शक सूचना जारी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळे आता कोणतीही पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नसल्याने महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सर्व पात्र महिलांना न्याय
शासनाच्या या निर्णयामुळे केवळ तांत्रिक चुकीमुळे अडकलेल्या खऱ्या पात्र लाभार्थी महिलांना मोठा आधार मिळाला आहे. लवकरच पडताळणी पूर्ण होऊन त्यांचे थकीत आणि नियमित हप्ते बँक खात्यात जमा होतील,अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी प्रमोद येंडोले यांनी “हिंदवार्ता”शी बोलतांना दिली.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!