स्मार्ट बुलढाणा

जीवनात यशस्वी होण्यासाठी अपमानाची शिदोरीच प्रेरणादायी ठरते: प्राचार्य डॉ.गजानन जाधव

मोताळा,(प्रतिनिधी) :जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणाचा तरी आदर्श डोळ्यासमोर असला पाहिजे. तो जगात शोधण्यापेक्षा आपल्या परिसरातील कर्तुत्वान व्यक्तींमध्ये शोधल्यास त्याच्या दैनंदिन जीवनातील पारदर्शकता आणि नीतिमत्ता जगण्याचे बळ देते. जीवनात यशस्वी होण्यासाठी अपमानाची शिदोरीच प्रेरणादायी ठरते. तोच अवमान सुभाषबाबूंनी उरात बाळगला. आयसीएस परीक्षा पास होऊनही ब्रिटिशांच्या गुलामगिरीची नोकरी नाकारली म्हणूनच ते महानायक ठरले, असे मत शिवाजी शिक्षण संस्था मोताळाचे प्राचार्य डॉ. गजानन जाधव यांनी व्यक्त केले.
देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर व्याख्यान कार्यक्रम २३ जानेवारीला दुपारी संस्थेच्या भाऊसाहेब देशमुख सभागृहामध्ये पार पडला. जिल्हाधिकारी किरण पाटील आणि पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोराखेडी ठाणेदार महेत्रे, कृषी अधीक्षक देशमुख, प्रबोधनकार ॲड. सतीशचंद्र रोठे, आझाद हिंद संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय साबळे, प्रा. कप्टन मेहेरकर याची प्रमुख उपस्थिती होती. दीप प्रज्वलन तथा महापुरुषांना अभिवादन करीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि व्याख्यानाला सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना ॲड.रोठे यांनी आत्मविश्वासाच्या बळावर जगातले कोणतेही शिखर सहज गाठता येते. परंतु आत्मविश्वास जिवंत ठेवण्यासाठी वर्तमान परिस्थितीमध्ये जगता आले पाहिजे. वर्तमान परिस्थितीची जाणीव असली पाहिजे. तरच यशाच्या शिखरापर्यंत पोहोचता येते. यासह विविध सामाजिक, वैज्ञानिक उदाहरणे देत आपल्या खास शैलीत विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. प्रास्ताविक डॉ.चाटे तर सूत्रसंचालन डॉ. चित्रा मोरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.मास्कर, प्रा.डॉ.अरुण गवारे, प्रा.निलेश ढगे, दिनेश ढगे, प्रा. दादा मनगटे, प्रा.निलेश रहाटे, प्रा. डॉ. ठेंग यांच्यासह शिवाजी महाविद्यालय  (मोताळा) चे कर्मचारी वृंद आणि आझाद हिंद संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!