क्राईम जगत

मलकापूर: हरणखेड शिवारात मजुराला मारहाण

मलकापूर, (प्रतिनिधी): एका मजुराला जेवायला जाण्याच्या बहाण्याने नेऊन किरकोळ कारणावरून चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना हरणखेड शिवारात घडली. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी गैरअर्जदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
देवधाबा येथील रहिवासी पांडुरंग नामदेव सपकाळ (वय ३८ वर्षे) आणि विश्वजीत सिद्धार्थ चव्हाण (वय २८ वर्षे) हे दोघे एकाच गावातील राहणारे आहेत. २४ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास दोघेही दुचाकीने नारळीबाग हॉटेलवर जेवण करण्यासाठी गेले होते. मात्र, तिथे जेवण न करता विश्वजीतने पांडुरंग यांना हरणखेडला जाऊन येऊ, असे म्हणून त्याला सोबत नेले. दरम्यान, हरणखेड शिवारात जातांना विश्वजीतने पांडुरंग यांच्याशी विनाकारण वाद उकरून काढत त्यांच्यासोबत वाद घातला. वादाचे रूपांतर मारहाणीत होऊन विश्वजीतने पांडुरंग यांच्या डोक्यावर आणि कमरेवर चापटाबुक्क्यांनी मारहाण केली.
याप्रकरणी पांडुरंग सपकाळ यांनी मलकापूर ग्रामीण पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विश्वजीत चव्हाण याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ११५ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार रविकांत बावस्कर हे करीत आहेत.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!