क्राईम जगत

शेगाव हादरले! ८ लाखांच्या फसवणुकीतून पत्रकार राजु थेरोकार यांच्यावर जीवघेणा हल्ला

शेगाव,(प्रतिनिधी): पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून ८ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीने, पैसे परत मागणी करणाऱ्या पत्रकारावरच जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना शेगाव शहरात समोर आली. हॉटेल राजवाडा परिसरात घडलेल्या या घटनेमुळे संताप व्यक्त हात असून याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लांजुळ (ता.खामगाव) येथील रहिवासी आणि पत्रकार राजु उकर्डा थेरोकार यांनी अकोला येथील दिपक पवार याला दवाखान्याच्या कामासाठी आणि १५ दिवसांत पैसे दुप्पट करून मिळतील या आमिषाने ८ लाख रुपये दिले होते. मात्र, मुदत संपल्यानंतरही आरोपी पैसे देण्यास टाळाटाळ केली. तसेच आरोपी दिपक पवार याने राजु थेरोकार आणि साक्षीदार अमोल ढोल यांना संगनमताने शेगाव येथील हॉटेल राजवाडा समोर बोलावले. यावेळी मुख्य आरोपीसह तोंडाला रुमाल बांधून असलेल्या ५ ते ६ अनोळखी गुंडांनी “पैसे देत नाही”, असे म्हणत शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता या टोळीने हातातील लाकडी काठ्यांनी थेरोकार यांच्यावर हल्ला चढवला. त्यांच्या पायावर, हातावर आणि पाठीवर बेदम मारहाण करण्यात आली. मध्यस्थी करायला गेलेल्या अमोल ढोल यांनाही या गुंडांनी बेदम मारहाण केली आणि घटनास्थळावरून पसार झाले. नागरिकांनी थेरोकार यांना जखमी अवस्थेत सरकारी दवाखान्यात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
शेगाव शहर पोलिसांनी थेरोकार यांच्या जबाबावरून उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ११८ (१), १८९ (२), १९०, १९१ (२), १९१ (३), आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन सोनटक्के हे करीत आहेत.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!