स्मार्ट बुलढाणा

मृत्यूला कवटाळले: वडोदा पान्हेरा येथील ५० वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

मृत्यूला कवटाळले: वडोदा पान्हेरा येथील ५० वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): मलकापूर तालुक्यातील वडोदा पान्हेरा येथील एका ५० वर्षीय इसमाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची खळबळजनक घटना नुकतीच समोर आली. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक नोंद केली असून त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या वडोदा पान्हेरा येथील रहिवासी असलेले संजय प्रल्हाद पवार (वय ५० वर्षे) यांनी २६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.१० वाजेच्या पूर्वी आपल्या राहत्या घरात दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. नातेवाईकांच्या ही बाब लक्षात येताच मयत संजय पवार यांचे पुतणे उमेश गणेश पवार आणि भाचा अजय संजय इंगळे यांनी त्यांना तातडीने मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे वडोदा पान्हेरा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.पी.फेगडे यांनी तपासणीअंती मृत घोषित केले. रुग्णालयाच्या कक्षसेवक सारीका झाजोट यांनी मलकापूर ग्रामीण पोलिसांना दिलेल्या मेमो वरुण पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १९४ अन्वये मर्ग दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक उल्हास मुके हे करत आहेत. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!