क्राईम जगत
खळबळजनक: मलकापुरातून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): शहरातील मुकुंदनगर भागात राहणारी १८ वर्षीय तरुणी राहत्या घरातून अचानक बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना आज २८ जानेवारी रोजी समोर आली. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांत हरवल्याची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी बेपत्ता मुलीचा शोध सुरू केला आहे.
मलकापूर शहरातील मुकुंदनगर भागात एक मध्यमवर्गीय कुटुंब वास्तव्यास आहे. बेपत्ता झालेल्या मुलीची आई नेहमीप्रमाणे आज २८ जानेवारी रोजी देखील घरीच होत्या. दुपारी १ ते १.३० वाजता दरम्यान मुलीची आई घरातील बाथरूममधून बाहेर आल्या. तेव्हा त्यांना त्यांची मुलगी १८ वर्षीय मुलगी घरात दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी व कुटूंबियांनी तिची परिसरात आणि मित्र-मैत्रिणींकडे चौकशी केली. तसेच मलकापूर शहरात सर्वत्र तिचा शोध घेतला, नातेवाईकांकडे संपर्क साधून विचारणा केली. मात्र, तिचा कुठेही पत्ता लागला नाही. त्यामुळे हतबल झालेल्या या कुटुंबीयांनी मलकापूर शहर पोलिसांत धाव घेऊन मुलगी हरवल्याची तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी मिसिंग दाखल करून बेपत्ता मुलीचा शोध सुरू केला आहे.
बेपत्ता युवतीचा झालेली रंग गोरा, चेहरा गोल आणि डोळे काळे आहेत. तिने कथिया रंगाचा टॉप, पांढऱ्या रंगाची लेगीज, काळ्या रंगाची ओढणी परिधान केली असून पायात स्लीपर चप्पल घातलेली आहे. वरील वर्णनाच्या मुलीबद्दल माहिती मिळाल्यास मलकापूर शहर पोलिसांसोबत संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अंमलदार रवींद्र दळवी यांनी केले आहे.



