क्राईम जगत

“त्या” चोरट्यास धाड पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

अवघ्या काही दिवसांतच केला गुन्ह्याचा उलगडा

अभिनय बोर्डे
धाड, (प्रतिनिधी): स्थानिक राजे संभाजी चौक परिसरात असलेल्या एका घरासमोरून २१ जानेवारी रोजी एक दुचाकी चोरीस गेली होती. या प्रकरणी २२ जानेवारी रोजी धाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पोलिसांना चोरट्यांचा छडा लावण्यात यश आले आहे. नव्हेतर उपरोक्त चोरट्याला जेरबंद करण्यात आले असून त्याने चोरलेली दुचाकीही हस्तगत करण्यात आली आहे.
स्थानिक हनुमान गल्ली परिसरात राहणारे शेषराव नामदेव ठाकरे यांची दुचाकी क्रमांक एमएच-२८-एएच-४१०४ त्यांचा चुलत भाऊ नितीन जनार्दन ठाकरे हा घेऊन गेला होता. २१ जानेवारी रोजी सदर दुचाकी बावस्कर यांच्या किराणा दुकानासमोर उभी केली होती. रात्री १०.१५ ते २२ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान बावस्कर यांच्या किराणा दुकानासमोरून सदर दुचाकी चोरीला गेली होती. याप्रकरणी धाड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे, पोलीस अंमलदार श्रीकृष्ण चव्हाण, युवराज मुळे, महिला पोलीस अंमलदार वैशाली कोरडे, पोलीस अंमलदार इंगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तांत्रिक बाबी आणि मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे मधुकर रंगनाथ रामफळे (वय २८ वर्षे) रा. रुईखेड मायंबा याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता,  त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली देत चोरलेली दुचाकी पोलिसांच्या स्वाधीन केली. त्यामुळे अवघ्या आठ दिवसांत उपरोक्त गुन्हा उघडकीस आला. दरम्यान, आज २९ जानेवारी रोजी आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता,न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!