स्मार्ट बुलढाणा
बुलढाणा: “नर्सिंग”च्या नावाने देहविक्रीचा बाजार!
पवित्र नर्सिंग क्षेत्राला बदनाम करण्याचा प्रयत्न;झारखंडच्या त्या "ब्युटी"चा बुरखा फाटला

बुलढाणा,(प्रतिनिधी): प्रवाशांनी फुललेलं बसस्टँड, अंगाला झोंबणारी गुलाबी थंडी, मद्याची कैफ आणि त्या धुंदीत हरवलेले तारुण्य आणि बुलढाणा बसस्थानकावर “त्या” तरुणीने केलेल्या हायव्होल्टेज ड्रामाचा बुरखा फाडण्यात बुलढाणा शहर पोलिसांना अखेर यश आले. नव्हेतर झारखंडहून आलेल्या “नर्स”चे सत्य पोलिसांनी समोर आणले असून ती कोणाचे आजार बरे करणारी परिचारिका बनण्यासाठी आलेली नसून पैशांसाठी देहाची बोली लावणारी “कॉल गर्ल’ असल्याचे तपासत निष्पन्न झाले. सध्या या तरुणीला पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘सखी वन स्टॉप सेंटर”मध्ये ठेवले असून आता “ते” प्रतिष्ठित पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बुधवार, २८ जानेवारीची ती सायंकाळ या तरुणीसाठी “रोमँटिक” बेत घेऊन आली होती. झारखंडच्या या तरुणीने आपल्या काही खास गिऱ्हाईक-मित्रांसोबत मनसोक्त मद्यप्राशन केले. मद्याचे पेग जसे वाढत गेले, तसा तिचा स्वतःवरील ताबा सुटत गेला. ज्यांच्यासोबत या तरुणीने “रंगीत मैफल” जमवली त्यांनी आपले काम फत्ते झाल्यावर तिला बुलढाणा बसस्थानक परिसरात आणून सोडले. प्रवाशांच्या वर्दळीत बसस्थानकावर डुलणाऱ्या या तरुणीच्या सौंदर्यावर टपलेल्या दोन दुचाकीस्वारांनी तिला तेथून पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नशिबाने खाकी वर्दीतील देवदूत अर्थात बसस्थानकावर तैनात असलेलेली महिला सुरक्षा रक्षक तिच्या मदतीला धावून गेली. सुरक्षा रक्षकांनी जेव्हा या तरुणीला पोलीस चौकीत नेले, तेव्हा तिची अवस्था अत्यंत दयनीय झालेली होती. ती कधी स्वतःला पुण्याची सांगत होती, तर कधी बुलढाण्यातील. तिच्या बॅगची झडती घेतली असता त्यात कंडोमची पाकिटे मिळून आली, तर मोबाईलमध्ये शहरातील अनेक प्रतिष्ठित म्हणवल्या जाणाऱ्या लोकांचे नंबर मिळून आले. पोलिसांनी या नंबरवर संपर्क साधला, तेव्हा अनेकांनी तिला ओळखण्यास चक्क नकार दिला,तर कोणी कानाला हात लावले. अखेर झारखंडमधील तिच्या भावाशी संपर्क झाला असता, त्याने तरुणी झारखंडची असल्याचे सांगितले.
पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेऊन बुलढाणा शहर पोलीस स्टेशन गाठले. तिला पोलिसी खाक्या दाखवताच या प्रकरणातील रोमँटिक पडदा बाजूला झाला. तिच्या बॅगेत आढळलेली कंडोमची पाकिटे तिची खरी व्यावसायिक ओळख सांगू लागली. तर तिच्या मोबाइलमध्ये बुलढाण्यातील अनेक “रंगेल” शौकिनांचे नंबर मिळाल्याने तरुणी कोणते “नर्सिंग” करायची, ही बाब समोर आली. सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे देणाऱ्या या तरुणीने अखेर ती कॉल गर्ल असल्याचे कबूल केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी तिची रवानगी जिल्हा सामान्य रुग्णालयातील “सखी वन स्टॉप सेंटर”मध्ये केली आहे. तर नर्सिंगच्या नावाखाली बुलढाणा शहरात मोठे सेक्स रॅकेट तर सक्रिय नाही ना?,शहरातील ते “प्रतिष्ठित” चेहरे कोण?, झारखंडच्या या तरुणीचे ते नियमित “क्लायंट” होते?, याचा पोलीस शोध घेत आहे.



