स्मार्ट बुलढाणा

कवी मोतीराम कापरे यांचा सत्कार

धाड,(प्रतिनिधी): मासरुळ येथील रहिवासी तथा धामणगाव येथील जि.प.कें.मराठी उच्च प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले शिक्षक मोतीराम किसन कापरे यांच्या शैक्षणिक उपक्रमांची तसेच आठ साहित्यिक पुस्तके प्रकाशित झाल्याबद्दल २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी सत्कार करण्यात आला.

केंद्रसमन्वयक आर.व्ही.यंगड यांच्या अध्यक्षतेखालील पार पडलेल्या या कार्यक्रमात किशोर नाटेकर, ठमाजी साकळे, राहुल हिवाळे, नलिनी राऊत, इंगळे, शिक्षिका सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती होती. विदर्भ बारी समाज युवा प्रकोष्ठचे अध्यक्ष महेंद्र बोडखे तसेच विदर्भ बारी समाज युवा प्रकोष्ठचे सचिव देवेंद्र पायघन यांच्या मार्गदर्शनाखाली धामणगाव शाळेच्या माजी अध्यक्षा वैशालीताई देवेंद्र पायघन, सरपंच दुर्गाबाई सुरडकर, पोलीस पाटील सविताताई पवार, उपसरपंच केशरताई भिमराव पायघन यांच्या हस्ते त्यांना संत रुपलाल महाराज बारी समाज सन्मान स्मृती चिन्ह व सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!