क्राईम जगत

खामगाव: क्षत्रिय ढाब्यावर दोन तरुणांकडून घातक शस्त्रे जप्त

अजय टप
खामगाव: खामगावमध्ये दरोडा टाकण्यासाठी गेलेल्या दरोडेखोरांनी घरमालक व त्यांच्या मुलावर घातक शस्त्रांनी वार करून त्यांना जखमी केल्याची घटना ताजी असतानाच खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या क्षत्रिय ढाबा परिसरात पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या एका मोठ्या कारवाईमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी कारवाईत दोन तरुणांना बेकायदेशीरपणे घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चाकू आणि सुरा हस्तगत करण्यात आला आहे.
खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पथक २९ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री १२.४० वाजेच्या सुमारास  कोलोरी शिवार परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी क्षत्रिय ढाब्याजवळ पोलिसांना काही संशयास्पद तरुण असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने धाब्याचा दिशेने धाव घेतली. सदर ठिकाणी उभ्या असलेल्या तरुणांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे धारदार चाकू आणि सुरा, असे घातक शस्त्रे मिळून आली. विशेष म्हणजे सध्या संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये शस्त्रबंदी लागू करण्यात आलेली आहे. असे असताना उपरोक्त तरुणांनी नियमांचे उल्लंघन करून स्वतःच्या जवळ शस्त्रे बाळगली.
याप्रकरणी याप्रकरणी पोलीस अंमलदार बाळकृष्ण सहदेव फुंडकर यांच्या फिर्यादीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांत आरोपी मोहम्मद उबेद मोहम्मद मतीन (वय २२ वर्षे) आणि मोहम्मद सुफियान फैज मोहम्मद (वय १९ वर्षे) दोघेही रा. बाळापूर (जि. अकोला) तसेच अन्य अकविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ४, २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार किरण राऊत हे करीत आहेत. हे तरुण रात्रीच्या वेळी शस्त्रे घेऊन कोठे जात होते, त्यांचा काही घातपात करण्याचा इरादा होता का, याचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!