स्मार्ट बुलढाणा

बुलढाणा: दुचाकी धडकेत महिला गंभीर

अजय टप
बुलढाणा: बुलढाणा शहरातील चिखली रोडवर एका भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.  अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांत दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजनगाव (जि.छत्रपती संभाजीनगर) येथील रहिवासी असलेले सिद्धांत विलास मोरे यांच्या आई आशा मोरे या २७ जानेवारी रोजी रात्री ९.३० च्या सुमारास चिखली रोडवरील बालाजी स्वीटमार्ट जवळून पायी जात होत्या. दरम्यान, समोरून येणाऱ्या
एमएच-२८-सीडी-७०४६ क्रमांकाच्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित दुचाकीवर सुजल साळवे हा चालक आपल्या दोन मित्रांसह ट्रिपल सीट भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे गाडी चालवत होता. धडक लागल्याने आशा मोरे या जमिनीवर कोसळून गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर जखमी आशा मोरे यांना तातडीने बुलढाणा येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील अलाईन्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
या प्रकरणी सिद्धांत मोरे यांच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसांत आरोपी चालक सुजल साळवे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम २८१, १२५ (अ) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार रवी राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार सुभाष म्हस्के हे करीत आहेत.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!