स्मार्ट बुलढाणा

काळाचा घाला: दोन भीषण अपघातात एक ठार; दोन गंभीर

नांदुरा आणि देऊळगाव राजा येथील घटना

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील विकासाच्या धमन्या म्हणून ओळखले जाणारे काही रस्ते सध्या मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे दिसून येत आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या मार्गावर एक अपघातात हा ठरलेलाच आहे. सुरू असलेले हे अपघातांचे सत्र काही केल्या ठेवण्याचं नाव घेत नसल्याचे चित्र आहे. गेल्या २४ तासांत नांदुरा आणि देऊळगाव राजा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या दोन मोठ्या अपघातांमधील एका अपघातात ३० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दुसऱ्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. या दोन्ही घटनांप्रकरणी नांदुरा आणि देऊळगाव राजा पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
निमगाव जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव गड येथील रहिवासी असलेले लखन प्रताप सस्त्या यांचा लहान भाऊ गोपाल आणि त्याचा मित्र गणेश थोरात हे दोघे दुचाकीने पिंप्री देशमुखकडे जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत गोपाळचा जागीच मृत्यू झाला, तर गणेश थोरात हा गंभीर जखमी झाला. तर प्रकाश रंगनाथ पाटोळे (रा.शिराळा) हे त्यांच्या दुचाकी क्रमांक एमएच-२१-एझेड-१४४२ ने जालना येथून घरी जात होते. ते अशोक ढाब्यासमोर पोहोचले असता, पाठीमागून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर क्रमांक एमएच-२८-बीक्यू-१९८१ या कारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात प्रकाश पाटोळे हे गाडीवरून खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला, हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली.
या प्रकरणी प्रकाश रंगनाथ पाटोळे यांनी देऊळगाव राजा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कार चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १२५ (अ) आणि कलम १३४ नुसार अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार गोरे हे करीत आहेत. जिल्ह्यातील विविध रस्त्यांवर घडणाऱ्या अपघातांच्या विविध घटना चिंतेची बाब ठरत आहेत.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!