स्मार्ट बुलढाणा

नांदुरा-निमगाव रोडवर अपघातात एक ठार, तर दुसरा गंभीर

अजय टप
नांदुरा: नांदुरा ते निमगाव रोडवरील तांदळे यांच्या नवीन बांधक सुरू असलेल्या पेट्रोल पंपासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका ३० वर्षीय दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू , तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना ३० जानेवारीच्या सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. या भीषण अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव गड येथील रहिवासी असलेले गोपाल प्रताप सस्त्या (वय ३० वर्षे) आणि त्याचा मित्र गणेश थोरात रा. पिंप्री देशमुख, हे दोघे युनिकॉर्न दुचाकीने क्रमांक एमएच-२८-बीजी-६८५३ ने वडगाव गड येथून पिंप्री देशमुखकडे जात होते. नांदुरा रोडवरील नवीन बांधकाम सुरू असलेल्या पेट्रोल पंपाजवळ येताच त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात आणि निष्काळजीपणाने चालवून पाठीमागून जबर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, गोपाल सस्त्या यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. तर गणेश थोरात हा गंभीर जखमी झाला. अपघात घडल्यानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पळून गेला. या अपघातात दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेमुळे वडगाव गड परिसरात शोककळा पसरली आहे.
या प्रकरणी लखन प्रताप सस्त्या यांनी नांदुरा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम १०६ (१), २८१, १२५ (a), ३२४ (४) आणि मोटर वाहन कायद्याचे कलम १३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार गजानन इंगळे हे करीत आहेत.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!