स्मार्ट बुलढाणा

ब्रेकिंग: मर्दडी देवीच्या घाटात ऊसाचा ट्रक पलटी 

ट्रकचालक बालंबाल बचावला 

धाड,( प्रतिनिधी): येथून जवळच असलेल्या मर्दडी देवीच्या घाटात आज ३ फेब्रुवारीच्या दुपारी १.३० वाजता दरम्यान ऊस वाहतूक करणाऱ्या एका ट्रकचा भीषण अपघात झाला. घाटातील अवघड वळणावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने सदर ट्रक पलटी झाला. सुदैवाने अपघातात जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचालक  जखमी झाला आहे.

दुधा (ता. बुलढाणा) कडून युपी-८३-एटी-७६५३ क्रमांकाचा ऊसाने भरलेल्या एक ट्रॅक धाड येथील पैनगंगा साखर कारखान्याकडे जात होता. हा ट्रॅक मर्दडी देवीच्या घाटातील वळणावर पोहोचल्यानंतर ट्रॅक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि सदर ट्रक रस्त्यावरच पलटी झाला. त्यामुळे ट्रकमधील ऊस रस्त्यावर पडला. या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र, ट्रकचालक किरकोळ जखमी झाला. अपघात घडताच रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी मदतीसाठी ट्रकचालकाकडे धाव घेऊन त्याला उपचारासाठी धाड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच धाड पोलिसांनी घटस्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करत घटनास्थळ पंचनामा केला. घटनेचा पुढील तपास ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनात धाड पोलीस करीत आहेत.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!