क्राईम जगत

शेगावमध्ये बलात्कार! जीवे मारण्याची धमकी देत तरुणीची अब्रू लुटली

जिल्हाभरात संतापाची लाट

अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): संत गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका १९ वर्षीय निष्पाप तरुणीला नराधमाने फूस लावून लॉजवर नेले. नव्हेतर बळजबरीने तिच्या अब्रूची लचके तोडली. एवढ्यावरच न थांबता पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली. तिचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. ही संतापजनक नुकतीच शेगाव (जि.बुलढाणा) मध्ये उघडकीस आली. या घटनेमुळे बुलढाणा जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून उपरोक्त नराधमास फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
सोनाळा (ता.संग्रामपूर) येथील १९ वर्षीय तरुणी २ फेब्रुवारी २०२६ रोजी शेगाव येथे दर्शनासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी आकाश सोनाजी भामद्रे (रा.सोनाळा) याने तिला तिथे गाठले. “मला तुझ्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे,” असे म्हणत त्याने तिला तरुणीचा विश्वास संपादन केला. तसेच तरुणीला दुपारी १ ते १:३० च्या दरम्यान मंदिर परिसरात असलेल्या एका लॉजवर घेऊन गेला आणि सदर ठिकाणी त्याच्यातील हैवान जागी होऊन त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. तरीही आरोपीने तरुणीला बाहुपाशात ओढले आणि तिच्यावर पाशवी अत्याचार केला. या कृत्यानंतर “जर तू याबद्दल कोणाला सांगितले, तर तुला जिवंत ठेवणार नाही.”, अशी धमकी देखील पीडितेला दिली. मात्र, त्याच्या धमकीला भीक न घालता पीडितेने शेगाव शहर पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी ३ फेब्रुवारी रोजी या प्रकरणी भारतीय न्याय संहिताचे कलम ६४, ७४, ३५१ (२) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. खामगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील आणि शेगाव शहरचे ठाणेदार मेहत्रे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळ पंचनामा केला. गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील हे करीत आहेत.
दरम्यान, धार्मिक स्थळाच्या परिसरात घडलेली ही घृणास्पद घटना गांभीर्याने घेऊन प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी होत आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!