क्राईम जगत

लोणारमध्ये बनावट कीटकनाशके पकडली

२९ हजारांचा मुद्देमाल जप्त; कृषी केंद्र धारकाविरुध्द गुन्हा दाखल

लोणार,(प्रतिनिधी): शेतकऱ्यांच्या शेतीवर थेट परिणाम करणाऱ्या बनावट कृषी औषधांच्या विक्रीचा गोरख धंद्याचा गंभीर प्रकार लोणार शहरात नुकताच उघडकीस आला. अरिहंत ॲग्रो कृषी सेवा केंद्र (लोणार) येथे होणाऱ्या सिंजेता कंपनीच्या नावाने बनावट इसाबेन (१ लिटर) या औषधांची विक्रीचा पोलीस व कृषी विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला. या कारवाईत २९ हजार ८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कृषी सेवा केद्र चालकाविरुध्द गुन्हा दरखल करण्यात आला आहे.
शहरातील अरिहंत ॲग्रो कृषी सेवा केंद्रात सिंजेता कंपनीचे इसाबेन औषध बनावट स्वरूपात पॅकेजिंग करून विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस प्रशासन आणि कृषी विभागाच्या पथकाने उपरोक्त दुकानावर छापा टाकला. त्यावेळी दुकानातील रॅकमधून तसेच पाठीमागील स्टोअर रूममधून इसाबेन १ लिटर सिंजेता कंपनीच्या १६ सिलबंद बॉटल्स, असे एकुन २९ हजार ८ रुपयांचा मुद्देमाल मिळन आला. सदर बॉटल्सची तपासणी केली असता, त्या बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

मूळ बॉटलच्या तुलनेत बनावट बॉटलवरील लोगोचा रंग फिक्कट हिरवा आढळून आला, तर मूळ बॉटलवर गडद हिरव्या रंगाचा लोगो आहे. तसेच इंग्रजीतील जीटीआयएन, जीटीआयएन नंबरमधील ‘२’ ऐवजी ‘०२’, सिरीयल नंबरमधील फॉन्टमधील फरक, तसेच बॉटलच्या झाकणाच्या रंगातही तफावत आढळून आली. या बनावट औषधांची विक्री करून आरोपीने संजेता कंपनीची प्रतिमा मलीन केली. शासनाच्या महसुलाचे नुकसान केले. तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक व शेतीविषयक मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण केल्याची तक्रार सतीश तानाजी पिसाळ (वय ३४ वर्षे), रा. नाशिक यांनी लोणार पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी सचिन सुभाषचंद्र बोरा (वय ४७ वर्षे), रा. लोणार याच्याविरुध्द दुकानदाराविरुद्ध प्रतिलिपी अधिकार अधिनियम १९५७ (सुधारित १९८४ व १९९४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनंजय इंगळे हे करीत आहेत. या कारवाईमुळे लोणार परिसरात बनावट कृषी औषध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून शेतकऱ्यांनी औषधे खरेदी करताना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!