क्राईम जगत

अमडापूरच्या बोरगावमध्ये खुनी हल्ला 

चार जणांवर गुन्हे दाखल

अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी) : किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले. नव्हेतर एकावर चाकूने प्राणघातक हल्ला करून वादाला रक्तरंजित केल्याची धक्कादायक घटना अमडापूर (ता.चिखली) पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बोरगाव काकडे येथे घडली. या प्रकरणी अमडापूर पोलिसांत चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोरगाव काकडे (ता.चिखली) येथील रहिवासी असलेले परमेश्वर प्रल्हाद साठे (वय ४५ वर्षे ) यांच्या मुलाने रस्त्यावर मोटारसायकल उभी केली होती. आरोपी सागर सुनील काकडे याने आपल्या ट्रकने सदर मोटारसायकलला धडक दिल्याच्या कारणावरून दोन कुटुंबामध्ये वाद पेटला. नव्हेतर या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपी ज्ञानेश्वर गजानन काकडे आणि सुनील इनकराव काकडे यांनी साठे यांचा मुलगा, पत्नी आणि मुलगी यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. तर आरोपी रमेश गजानन काकडे याने त्याच्या हातातील चाकूने परमेश्वर साठे यांच्या पोटावर जबर वार केला. या हल्ल्यात साठे गंभीर जखमी झाले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले असून उपचार सुरू आहे. या प्रकरणी परमेश्वर साठे यांनी अमडापूर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सागर सुनील काकडे, ज्ञानेश्वर गजानन काकडे, सुनील इनकराव काकडे आणि रमेश गजानन काकडे यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ११५, ३५२, ३५१ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार जयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण टेकाळे हे करीत आहेत.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!