क्राईम जगत

“त्या” महिलेचा मृत्यू प्रकरणी १० महिन्यांनी गुन्हा दाखल

अडाणी आणि तांत्रिक अडचणींमुळे झाला विलंब

अजय टप

मलकापूर, (प्रतिनिधी) : अज्ञात दुचाकीस्वाराने रस्त्याच्या साफसफाईच्या कामासाठी जाणाऱ्या एका ४६ वर्षीय महिलेला जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. अपघाताची ही घटना मार्च २०२५ मध्ये घडली होती. मात्र, फिर्यादी हे अडाणी असल्याने आणि तांत्रिक अडचणींमुळे या प्रकरणाची तक्रार उशिरा प्राप्त झाल्याने जळगाव जामोद पोलिसांनी तब्बल १० महिन्यांच्या विलंबानंतर अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नांदुरा येथील रहिवासी असलेल्या संगीता राजेंद्र पवार (वय ४६ वर्षे) ह्या ११ मार्च २०२५ रोजी सकाळी १०.३० ते ११ वाजता दरम्यान अमोल बावने यांच्या ॲपे रिक्षाने मांडवा येथे रस्ते साफसफाईच्या कामासाठी निघाल्या होत्या. माणेगाव ते तीवडी रोडवरील वीटभट्ट्यांसमोर रिक्षा उभी असताना, एका अज्ञात दुचाकी चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव आणि निष्काळजीपणे चालवून रिक्षात बसलेल्या संगीता पवार यांना जोराची धडक दिली. या धडकेत संगीता पवार यांच्या उजव्या पायाच्या मांडीला आणि शरीराला गंभीर जखमा झाल्या होत्या. दुखापतीमुळे अखेर त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी त्यांचा मुलगा महेश राजेंद्र पवार (वय २२ वर्षे) यांनी जळगाव जामोद पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ८ फेब्रुवारी रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ (१), २८१ आणि मोटार वाहन कायद्याचे कलम १३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार अतुल मोहाळे हे करीत आहेत.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!