क्राईम जगत

क्राईम डायरी: दोन मृत्यूंच्या घटनांनी बुलढाणा जिल्हा हादरला

हुंडाबळीचा छळ, चाकूने प्राणघातक हल्लाही झाला

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात ९ फेब्रुवारी घडलेल्या गंभीर गुन्ह्याच्या घटनांनी आणि अपघाती मृत्यूच्या सत्रामुळे खळबळ उडाली आहे. मेहकर येथे सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने तक्रार दाखल केली. बोराखेडीत क्षुल्लक कारणावरून तरुणावर प्राणघातक हल्ला झाला. तर जळगाव जामोद आणि धाड पोलीस स्टेशन अंतर्गत दोन दुर्दैवी मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त शंभरावर विविध घटनांची पोलिसांच्या अभिलेखावर नोंद झाली आहे.
१० लाखांच्या हुंड्यासाठी छळ
मेहकर (जि.बुलढाणा) शहरातील समता कॉलनी परिसरात राहणाऱ्या नेहा विरेंद्र ढवळे (वय ३५ वर्षे) यांनी पती विरेंद्र ढवळे आणि सासरच्या इतर ५ जणांविरुद्ध छळाची तक्रार दिली आहे. नेहा यांच्या तक्रारीवरून त्यांचा विवाह झाला असून, पती, सासू-सासरे, नणंद आणि दिर यांनी संगनमत करून त्यांच्याकडे “माहेरून १० लाख रुपये घेऊन ये”, असे म्हणत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. पैसे न आणल्यास जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी त्यांनी महिला तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार केली होती. मात्र, तडजोड झाली नाही.महिला तक्रार कशाच्या अहवालानंतर मेहकर पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५, ११५ (२), ३५१ (२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
तरुणावर चाकूने हल्ला
बोराखेडी: बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेलापूर बसस्टॉपवर आईस्क्रीम खाण्यासाठी थांबलेल्या एक तरुणावर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. आकाश सुरेश बोदडे (वय २५ वर्षे) याने आणि त्याच्या भाच्याने हॉटेलवर जेवण केले. त्यानंतर ते दोघे आईस्क्रीम खाण्यासाठी शेलापूर बसस्टॉपवर थांबले. त्यावेळी आरोपी दीपक बोरसे याने विनाकारण त्यांच्यावर टोकदार वस्तूने हल्ला केला. तसेच अश्लील शिवीगाळ करून जीवने ठार मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी आकाश बोदडे याने बोरखेडी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ३५२, ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
विषप्राशन केल्याने तरुणाचा मृत्यू
जळगाव जामोद: जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सुणगाव येथील रवी प्रल्हाद दामधर (वय ३५ वर्षे) या तरुणाने विषारी औषध प्राशन केले होते. कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात भरती केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीवरून जळगाव जामोद पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार शेख इरफान हे करत आहेत.
१६ वर्षीय मुलाचा मृत्यू
धाड: डोक्याला गंभीर मार लागल्याने एका १६ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
धाड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोदेगाव येथील यश अंबादास जामुंदे (वय १६ वर्षे) या मुलाला २० जानेवारी रोजी डोक्याला गंभीर इजा झाली होती. नातेवाईकांनी त्याला छत्रपती संभाजीनगर येथील अपेक्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना २१ जानेवारी रोजी त्याची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या जिन्सी पोलिसांनी शून्य क्रमांकाने मर्ग दाखल करून प्रकरण धाड पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!