स्मार्ट बुलढाणा

कुसुम सर्व्हेक्षण व “स्पर्श”मोहिमेतून व्यापक जनजागृती

३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२६ मोहीम कालावधी

बुलढाणा,(प्रतिनिधी) : स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान व कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) विशेष सर्व्हेक्षण मोहीम ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून कुष्ठरोगाबाबत समाजात व्यापक जनजागृती करण्यात येत असून आजपर्यंत बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत संदेश पोहोचविण्यात यश आले आहे.

स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत महिला मंडळे, बचत गट, मानव विकास मिशन शिबिरे, आरोग्य मेळावे, आरोग्य सेवा सत्रे, भजन मंडळे, रांगोळी व निबंध स्पर्धा, कीर्तन, हस्तपत्रिका, म्हणी, शालेय आरोग्य शिक्षण कार्यक्रम, कुष्ठरोग शपथ कार्यक्रम, प्रभात फेरी तसेच वर्तमानपत्रे, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यांसह विविध समाज माध्यमांद्वारे जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत.

त्याचप्रमाणे कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) विशेष सर्व्हेक्षण मोहीमही जिल्ह्यात सुरू असून ग्रामीण व शहरी भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, नगरपालिका दवाखाने यांच्या कार्यक्षेत्रातील वीटभट्ट्या, चुना भट्ट्या, गिट्टी खदाने, आश्रमशाळा, वसतिगृहे, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, कारागृहे, बालसुधारगृहे, साखर कारखाने, औद्योगिक वसाहती तसेच भटके व स्थलांतरित नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे.

या सर्व ठिकाणी १७० आरोग्य पथकांच्या माध्यमातून आरोग्य सेवेपासून वंचित राहिलेल्या नागरिकांची कुष्ठरोग विषयक तपासणी केली जात आहे. कुष्ठरोगाची लक्षणे म्हणून फिकट पांढऱ्या किंवा लालसर तांबूस रंगाचे बधिर चट्टे, तेलकट व चकाकणारी त्वचा, भुवयांचे केस विरळ होणे, हात-पायांना मुंग्या येणे व बधिरता, बोटे वाकडी होणे, अंगावर गाठी येणे, मज्जासंस्था बाधित होणे, कानाच्या पाळ्या जाड होणे आदी लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी, तसेच तपासणीसाठी येणाऱ्या आरोग्य पथकांना सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य सेवा कुष्ठरोग विभाग, बुलढाणा यांनी केले आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!