क्राईम जगत

खळबळजनक : मेहकरमध्ये ऑन ड्यूटी “पोलिसा”वर हल्ला!

वाटिका चौकातील घटना; तीन जणांवर गुन्हा दाखल

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या एका पोलीस अंमलदाराची कॉलर पकडून त्यांना धक्काबुकी केली. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची धक्कादायक घटना मेहकर शहरातील वाटिका चौक परिसरात घडली आहे. या प्रकरणी मेहकर पोलिसांत तीन आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. घडलेल्या घटनेमुळे पोलिसांचा गुन्हेगारांवरील भाग आणि वचक तर कमी झाला नाही ना?, अशी शंका व्यक्त होत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर पोलीस स्टेशनमध्ये नेमणूकीस असलेले पोलीस अंमलदार शिवाजी श्रीराम चिमणे हे ११ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १०.१५ ते १०.३० वाजेच्या सुमारास मेहकर शहरातीलच वाटिका चौक येथे आपले शासकीय कर्तव्य बजावत होते. त्यावेळी एका होंडा शाईन मोटारसायकलवर क्रमांक एमएच-२८-बीएच-६६६८ वर स्वार होऊन तीन तरुण आरडाओरड करत ट्रिपल सीट चौकातून जात होते. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्यांना हटकले आणि समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या तरुणांनी पोलिसांना टोकाची मग्रुरी दाखवली. एवढ्यावरच न थांबता “ऑन ड्यूटी” पोलिसाची कॉलर पकडून त्यांना धक्काबुकी केली. यातील मुजाहीद मुकददर कुरेशी याने पोलीस अंमलदार चिमणे यांच्या सरकारी गणवेशाची कॉलर पकडून त्यांना धक्काबुकी केली. तसेच त्याच्यासोबत असलेल्या शेख बिलाल शेख अयाज आणि रेहान वाजीद कुरेशी या टवाळखोराने पोलिसांना अश्लील शिवीगाळ करत लोटपाट केली. यावेळी उपस्थित काही साक्षीदारांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांच्याही अंगावर धावून जात परिसरात मोठा गोंधळ घातला. घडलेली ही घटना कायद्याची पायमल्ली करणारी गुन्हेगारांचे मनोबल वाढवणारी आहे. तर अशा घटनांमुळे पोलिसांचे मनोगत खच्चीकरण होण्याची शक्यता असल्याने संबंधित आरोग्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
दरम्यान, या प्रकरणी पोलीस अंमलदार चिमणे यांनी मेहकर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी मुजाहीद मुकददर कुरेशी (वय १८ वर्षे) रा. इमामवाडा, मेहकर, शेख बिलाल शेख अयाज (वय १८ वर्षे) रा. इमामवाडा, मेहकर, आणि रेहान वाजीद कुरेशी (वय १८ वर्षे) रा.माळीपेठ, मेहकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम १३२, २९६, ११५ (२), ३(५) आणि मोटार वाहन कायदा कलम १२८ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तापस महिला पोलीस उपनिरीक्षक कांचन जारवाल ह्या करत आहेत. सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला असला तरी अशा गुन्हेगारी वृत्तीचे कंबरडे मिळाल्याशिवाय गुन्हेगारांवर पोलिसांचा जरब बसणार नाही, एवढे मात्र खरे!

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!